PHOTO : निर्वासित म्हणून आली अन् 22 व्या वर्षी राजाचा प्रेमात पडली, ही मॉर्डन राणी आहे पैगंबरची वंशज

Queen of Jordan Rania al abdullah : सीरियात असद यांची सत्ता गेल्यानंतर अनेक अरब देशांमध्ये अस्थिरता पसरलीय. या यादीत जॉर्डन या देशाचाही समावेश आहे. जॉर्डनचा राजा अब्दुल्ला दुसरा देशाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. जॉर्डनचा विषय आला की जॉर्डनची राणी रानिया अल - अब्दुल्ला यांची चर्चा होते. 

| Dec 17, 2024, 21:46 PM IST
1/7

क्वीन रानिया अल यासीन: लव्ह लाईफ असो, लग्न असो किंवा त्यापूर्वीचे आणि नंतरचे आयुष्य, जॉर्डनची राणी रानिया अल-अब्दुल्ला खूप मनोरंजक आहे. पॅलेस्टिनी वंशाच्या रानियाचा जन्म 31 ऑगस्ट 1970 रोजी कुवेतमध्ये झाला. पण 1991 मध्ये रानियाच्या कुटुंबाला इतर हजारो पॅलेस्टिनींप्रमाणे कुवेत सोडून जॉर्डनच्या अम्मान शहरात स्थायिक होण्याची वेळ आली होती.

2/7

कुवेतमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कैरो इथे अमेरिकन विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनाची पदवी घेतली आणि काही काळ सिटी बँकेत नोकरी केली.

3/7

नंतर त्यांनी जॉर्डनमध्ये काम केलं. दरम्यान, जानेवारी 1993 मध्ये त्यांनी एका डिनर पार्टीत प्रिन्स अब्दुल्ला बिन अल-हुसेन यांची भेट घेतली. यानंतर वयाच्या 22 व्या वर्षी 10 जून 1993 रोजी एका शानदार सोहळ्यात तिने अब्दुल्लासोबत लग्न झालं. 

4/7

अब्दुल्ला यांचं वडील राजा हुसेन यांचं 1999 मध्ये निधन झालं. त्यानंतर अब्दुल्ला यांना सिंहासनावर बसवण्यात आलंय. त्यामुळे रानिया अल यासीन यांना राणी घोषित करण्यात आलं. 

5/7

राणी इस्लाम धर्माची असून त्याबद्दल ती आपलं मत व्यक्त करत असते. मॉर्डन राणीचे विचारही खूप आधुनिक आहे. तिने मुलांसाठी तीन पुस्तकं लिहिली आहेत. जॉर्डनमधील शैक्षणिक उपक्रम आणि युवा कार्यक्रमांसारख्या घरगुती उपक्रमांमध्येही ती सक्रिय असते.

6/7

दुसरीकडे, राजा अब्दुल्ला हे पैगंबर मोहम्मद यांच्या वंशातून आलेय. अब्दुल्ला II इब्न अल हुसेन हे प्रेषित मुहम्मद यांचं 41 व्या पिढीतील वंशज असल्याचं म्हटलं जातं. हेच कारण आहे की जॉर्डनची राजेशाही अरब जगाच्या विशेष तपासणीखाली येते. 

7/7

या शाही जोडप्याला 4 मुलं आहेत. 2 मुलं आणि 2 मुली. लग्नानंतर रानियाने जवळपास संपूर्ण जग फिरली असून ती खूप सक्रिय राहिलीय. क्वीन रानिया अल अब्दुल्ला सोशल मीडियावर सक्रिय असून ती अनेकदा तिच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.