डिअर जिंदगी : आपल्या जीवनातील दुसऱ्याचा `वाटा`
घाबरत-घाबरत फोन करत बसलेल्या आवाजात विचारलं, `आई, तुला राग येणार नाही, याची शपथ घे...
दयाशंकर मिश्र : माझं जीवन हे माझ्या आपल्या जवळच्यांसाठी आहे, हा एक पारंपरिक भारतीय लोकप्रिय विचार आहे. तरी देखील, आपलेपणाची व्याख्या सतत बदलत चालली आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. जीवनात पैसा आणि करिअरच्या वाढत्या संधी आल्याने, शहरातील फ्लॅट कल्चर वाढलं आणि या बदलत्या व्याख्येत याची खास भूमिका आहे. आपलेपणाची परिभाषा दिवसेंदिवस संकुचित होत चालली आहे. पहिल्यांदा आपलेपणात एकत्र 'कुटूंब' येत होतं, आता तर परिवाराचा अर्थ आई-वडील आणि त्यांचे एक-दोन मुलं एवढाच आहे.
पण या मर्यादीत होणाऱ्या कहाणीत 'वसुधैव कुटुम्बकम'ची कहाणी, अंधारात उजेड देणाऱ्या एखाद्या दीपस्तंभासारखी आहे. मनाचा असा प्रकाश ज्याच्यात सारं जग आपलं घर आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचे निवासी सुपरिचित पत्रकार, लेखक मुखर विधु लता यांची मुलगी रूपल. रूपलने अमेरिकेत असं काही केलं की, तिच्या निर्णयामुळे मनातील अंधार दूर होवून, मनाचे कोपरे उजळून निघाले.
लहान लहान गोष्टींमध्ये तुझं-माझं, यात अडकलेल्या समाजाला रूपल मानवतेची ओळख, फार साध्या-सोप्या पद्धतीने करून देते. आपल्या देशातील, आपल्या परिवारातील सदस्यासाठी एक सेमिस्टरचा ब्रेक घेणारे अनेक असतील. पण अमेरिकेसारख्या देशात शिकणारी, भारतीय रूपलने जेव्हा निर्णय घेतला की, आपली शेजारची टिबी नावाची महिला, जी स्तनाच्या कॅन्सरचा सामना करतेय, तिची देखभालीची आणि मदतीची तिला गरज आहे. तेव्हा रूपलने एका सेमिस्टरचा ब्रेक घेतला. काही प्रश्न तर तिच्या मनात देखील आले. पण रूपलने सर्व काही सोडून आपल्या अमेरिकन शेजारणीची काळजी घेण्याचा निर्णय घेतला.
सुशिक्षित होण्यासाठी सर्वात महत्वाचं शिक्षण मानवतेचं असावं लागतं. आता संपूर्ण कहाणी ऐका, जी रूपलची आई विधु लता यांनी सांगितलेली आहे. अमेरिकेतील महिला ज्याचं नाव टिबी आहे, ती आपल्या जर्मन पतीसोबत राहते, त्यांची रूपल शेजारी आहे. टिबीने ४ वर्ष ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत, आता कॅन्सरला मात दिली आहे. रूपलने तिच्या या लढ्यात एक शेजारी म्हणून नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन, आपल्या परिवारातील सदस्यासारखी भूमिका पार पाडली.
रूपल तिच्यासाठी सूप बनवण्यापासून, भारतीय जेवण करण्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचंही काम करत होती. यासोबत ती टीबीला कथा, कविता, गोष्टी, चुटकुले हिंदीतून इंग्रजीत भाषांतर करून सांगत होती.
मनापासून टिबीची काळजी घेतल्यानंतर, आज्ञाधारक रूपलने काही महिन्यांनी फोनवरून, आपली आई विधु लता यांना घाबरत-घाबरत फोन करत, बसलेल्या आवाजात विचारलं, 'आई, तुला राग येणार नाही, याची आधी शपथ घे, मी एक सेमिस्टरचा ब्रेक घेतला आहे, टिबीची काळजी घेण्यासाठी!'
मी विश्वासाने सांगू शकतो, विधु लताजी यांच्यासाठी त्यांच्या मुलीने, रागावण्यासाठी कोणतीही जागा सोडली नाही.
पहिल्या नजरेत या गोष्टीचं श्रेय हे रूपलला द्यायला हवं, असं मनात वाटतंय, पण जेव्हा मी थोडासा थांबून विचार करतो, श्रेय आपली वाट बदलून विधु लताजी यांच्याकडे जातं. रूपलने मानव आणि मानवतेचा जो स्नेहभाव, अमेरिकेतील लोकांमध्ये वाटला, ती त्या संगोपनाची, नात्याची, आत्मियतेच्या, स्नेहाच्या, मानवतेच्या बाळकडूचा परिणाम आहे, आणि याचं गोष्टीचं प्रमाण दिवसेंदिवस वेगाने समाजात कमी होत आहे.
समाजात प्रेम, आत्मियता, आणि मानवतेची कमी असल्याने, आत्मविश्वास आणि तणाव वाढत आहे. याची जबाबदारी मुलांची नाही, तर जास्त मोठ्यांची आहे. आम्ही रोपटं न लावता, वृक्षाची अपेक्षा करू शकत नाही. हे आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ, तेवढेच आपण प्रसन्न, सुखी आणि आनंददायी राहू.
(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )
(https://twitter.com/dayashankarmi)
(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)