डिअर जिंदगी : `सॉरी`ची सोबत, पण आपण `माफी`पासून दूर जातोय...
`सॉरी` खूपच सोपा आणि लोकप्रिय शब्द आहे, पण या सुपरहिट शब्दाने ज्या वेगाने आपली प्रतिमा खराब केली आहे.
दयाशंकर मिश्र : 'सॉरी' खूपच सोपा आणि लोकप्रिय शब्द आहे, पण या सुपरहिट शब्दाने ज्या वेगाने आपली प्रतिमा खराब केली आहे, याची मोठी किंमत आपण सर्व चुकवत आहोत. सॉरीला जवळ करत आपण माफीपासून दूर गेलो आहोत. 'सॉरी' भारतीय जनमानसात येण्याआधी, केवळ माफीने काम चालत नव्हतं. तुम्हाला अगदी कायद्यात बोलल्यासारखं एक वाक्य बोलावं लागतं होतं, मी आपली माफी मागतो. तुम्हाला माफीच्या एका प्रक्रियेतून जावं लागत होतं, ज्याच्या प्रभावात राहत असताना तुम्हाला, एका प्रकारे एका माफीच्या अनुभवातून जावं लागत होतं.
एक असा अनुभव ज्यात आपल्याला जाणवत होतं की, खरोखर आपली चूक झाली आहे. आता जग बदललं आहे. आपण प्रत्येक लहान लहान गोष्टीत मुलांना थँक्यू आणि सॉरी शिकवत असतो, मुलं हेच विसरले आहेत की, याचा खरा प्रभावी अर्थ काय आहे.
याचं उदाहरण पहिल्यांदा घराच्या पार्कजवळ पाहायला मिळालं, दोन मुलांमध्ये भांडण झालं, दोनही जणांचं वय दहा वर्षाच्या जवळपास होतं, दोन्ही जणांचे आईबाबाही तेथेच होते, त्यांनी समजुतदारपणा दाखवत आपल्या मुलांना सॉरी बोलण्यास सांगितलं. पण दोन्ही जणांनी असं बोलण्यास नकार दिला, खूप सांगूनंही मुलं असं बोलण्यास तयार नव्हते, कारण त्यांना वाटत होतं, चूक त्यांची नाहीय, मग सॉरी नेमकी कशासाठी?
मुलं असं का वागतायत?, त्यांच्या अशा वागण्यात एवढा मोठा बदल झालाय, याला जबाबदार कोण आहे? हा प्रश्न आईवडिलांना नेहमी चिंतेत टाकतो. आपण अशा काही गोष्टींवर नजर टाकूया, काही प्रमुख कारणांवर बोलू या...
१) मुलं सध्या एकत्र कुटूंबात फार कमी वाढतात. सध्या आई-वडील आणि एक किंवा दोन मुल अशी कुटुंब सर्वात जास्त आहेत. ते नेहमी आईवडिलांना भांडण करताना पाहतात, पण माफी मागत नाहीत. पालक आता जुन्या नियमाप्रमाणे आपल्या मुलांशी नाही भांडायचं, त्यांच्यासमोर अडचणींवर नाही बोलायचं, या गोष्टींना नाही मानत, मुलं या सवयींना 'कॉपी' करून 'पेस्ट' करतात.
२) टीव्हीवरील सचिन तेंडुलकरच्या सौम्यतेच दिवस आता राहिलेले नाहीत. आता तर टीव्हीवर आपल्या टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली जो लाखो मुलांचा आणि युवकांचा रोल मॉडेल आहे, तर कारण नसताना लढताना दिसतो, फक्त भांडतच नाही तर विरूद्ध टीमला भिडताना दिसतो, याचा मुलांच्या मानसिकतेवर सरळ परिणाम होतो.
३) आपल्या टेलिव्हिजनची भाषा, पहिल्यापेक्षा अधिक आक्रमक झाली आहे, विशेष म्हणजे चित्रपटातील भाषा. प्रत्येक गोष्टीवर हिंसा, प्रत्येक वेळी हिंसा. आधी अशा चित्रपटांपर्यंत मुलांची पोहोच नव्हती. पण आता मुलांना इंटरनेमुळे सर्व काही उपलब्ध आहे, ज्या गोष्टी आधी दिल्या जात नव्हत्या किंवा जाणूनबजून त्यांच्यापर्यंत पोहचू दिल्या जात नव्हत्या.
४) शाळा जेथे नैतिक शिक्षा सर्वात आवश्यक होती, तेथे शाळा आता बाहेर टाकण्यात आली आहे, आम्ही मुलांना मॅनर्स शिकवायला लागलो आहोत. पण मुल्यांवर आमचं लक्ष नाही, आम्ही त्यांना साधन, सुविधा तर देत आहोत, पण संस्कार देण्यात प्रत्येक दिवशी मागे पडत आहोत.
चंदीगडहून परतताना काही दिवसांपूर्वी आमच्या उभ्या असलेल्या कारला मागून बसने धक्का दिला. उपस्थित प्रवाशांच्या मदतीने कारला काढण्यात आलं, पण या दरम्यान ड्रायव्हरने माफी मागितली नाही. अनेक वेळा सांगूनही त्याला हे पटलंच नाही, की त्याने माफी मागावी. असं असण्याचं कारण म्हणजे त्याच्याकडून तेथे बोलणारे बहुसंख्य होते.
असंच, प्रत्येक दिवसाच्या जगण्यात आपण क्रूर होत आहोत, हे प्रमाण जोपर्यंत कमी होत नाही. तोपर्यंत आपल्याला आपल्या चुकीची खात्री होणार नाही. एका घटनेनंतर आपण दुसऱ्या घटनेतच नाही पोहोचत, तर पहिल्या घटनेतून मुक्त होतो. यात कोणताही कमीपणा नाहीय, फक्त आपण आपल्यासोबत धडा घेणं विसरू नये.
माफी मागण्यात लाज वाटणारा समाज हो शेवटी आपल्यासारखंच जग बनवत आहे. जेथे आत्मियता, स्नेह आणि प्रेम कमी होतं. कारण माफी न मागणारा, दुसऱ्याला माफ करण्याच्या सवयीपासून देखील दूर पळत सुटला आहे.
(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )
(https://twitter.com/dayashankarmi)
(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)