दयाशंकर मिश्र : प्रशंसेच्या माऱ्यात जे  विरघळत नाहीत, त्या जातकुळीतली लोकं, आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्रशंसा करणारे या बाबतीत स्वत: एवढे  'पारंगत' झाले आहेत की,  त्यांचा हात धरण्यासाठी कडक शिस्त, मन आणि मेंदूवर नियंत्रण असलं पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशंसा आणि चमचेगिरी यात एक फिकट रेषा आहे,  मुक्तपणे केली गेलेली प्रशंसा ही एक प्रकारची प्रेरणा आहे. पण चापलुसी प्रशंसा हा विकृत स्वभाव आहे. कथित लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्या आत तयार करण्यात आलेला एक मनोभाव, जो पुढे जाऊन मनोविकारात परिवर्तीत होतो. बहुतांश लोक विशेष व्यक्तीच्या सानिध्यात राहण्यासाठी, लाभ मिळवण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती, सर्व योग्यता, विचार करण्याची, समजण्याची क्षमता, हळू हळू कमी करतात. कारण त्यांना काही विशेष लोकांना प्रसन्न करायचं असतं.


मानवता, स्नेह याची कमतरता असली की आपल्याला फक्त दुसऱ्याकडून फक्त प्रशंसा हवी असते. टीका, कडवट सत्य, कडवट गोष्टींपासून आपण दूर जातो, प्रशंसेच्या पालखीत प्रवास करताना रममान होतो. यात भलं होणं तर दूर, पण जीवनात जास्त नुकसानंच होतं.


यात आपण रममान झालो की, आपल्याला पसंत नसलेल्या गोष्टीत अडकतो, अपेक्षेच्या दलदलीत फसत जातो. आतल्या आत घाबरतो, सत्य बोलायला, कारण आपल्याला वाटतं, आपण सत्य बोललो तर त्याला वाईट वाटेल. जे त्याला नावडतं आहे.


‘सोशल’ मीडिया आल्यानंतर आपण अपरिचित लोकांसाठी एक कडवट गोष्टींची निर्मितीच सुरू केली आहे. पूर्वग्रह दुषित आणि तेवढंच प्रशंसेच्या चाळणीत लपेटलेलं तथ्य, त्यांच्यासाठी ज्यांच्याजवळ आपली आशेची बेल वाजणार आहे.


प्रशंसेवर लिहण्याचा विचार करताना, एकापेक्षा एक उदाहरण लिहिण्यात ही कहाणी मिळाली. आपण सुद्धा फक्त एक मिनिट दिला तर तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता.
प्रशंसा पर लिखने के विचार के दौरान एक से बढ़कर एक मिसालों के बीच यह कहानी मिली. आप भी केवल एक मिनट खर्च करके इससे गुजर सकते हैं...


कहाणीचं नाव आहे...कीर्ती रक्षा.. कहाणी अशा प्रकारची आहे...


गोष्ट मागच्या जन्माची आहे. जेव्हा जगात एक साहसी देशाचा योद्धा लोकप्रिय होता. माझ्या देशवासीयांना माझ्यावर मोठा गर्व होता. देशासाठी मी नायक होतो. माझ्यावर त्यांना गर्व होता. देशवासी आपल्या वीरांची प्रशंसा करण्यात सदैव उत्सुक होते. बलिदानानंतर त्यांनी माझा भव्य पुतळा उभारण्याचं ठरवलं. मृत्यूनंतर स्वर्गात पोहचल्यावर एका देवदुतासमोर मी इच्छा व्यक्त केली. मी पाहू इच्छितो की, लोक मला कशाप्रकारे आठवत आहेत, श्रद्धेची लहर कशी चालतेय.


देवदुताने मला सांगितलं, तुम्ही जगातील अनेक जन्मात मोठी प्रतिष्ठा मिळवली आहे, चला तुमचा पहिला पुतळा पाहू या.
 
एका सुकलेल्या जंगलात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ, सुकलेल्या विहिरीजवळ देवदुताने आपलं वाहन थांबवलं आणि मला आत डोकावायला सांगितलं.


तिथे पाहा, विहिरीत सुखलेल्या मातीत, बांबूची दोन हात उंचची काठी आहे, ना तो तुझा कीर्ती स्तंभ आहे. त्या जन्मात तू त्या विहिरीत राहणारा बेडकांचा राजा होता आणि तुझ्या सन्मानात त्यांनी हा मोठा स्तंभ उभारला आहे.


देवमित्राच्या मदतीने मी जे वाचलं, ते या प्रकारचं होतं, आपल्या कुळातला सर्वात शक्तीशाली सदस्य, ज्यात या विहिरीतील सर्वात मोठी उंच, तीन फूट उडी मारण्याच्या संधी देऊन, ज्याला राजा निवडण्यात आलं होतं. त्याच्या सन्मानात या विहिरीत आम्ही, अधिक मौल्यवान धातुचा स्तंभ उभा करत होतो.


मी मित्राला लगेच परतण्याची विनंती केली. स्वर्गातून पृथ्वीवर या जन्मात मी परतल्यानंतर, देखील मला ती घटना आठवत आहे. जेव्हा कधी माझ्या, किंना माझ्या प्रिय व्यक्तीचा सन्मान, पुतळा उभारण्याविषयी लोक बोलतात, तेव्हा मी सावध होत असतो.


गोष्ट संपली...
या कहाणीचा नायक प्रशंसा, सन्मान, कीर्ती स्तंभाचा उल्लेख आल्यानंतर सतर्क होतो. आणि तुम्ही, जेव्हा असा प्रसंग येईल, ही गोष्ट नक्की आठवा. 


कदाचित काही मदत होऊ शकते.


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)