डिअर जिंदगी : दुसऱ्याच्या वाटेला `उजेड`
ज्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं, एवढंच नाहीतर आपण एक कठोर, हिंसक जग बनवण्यात सहभागी होतो.
दयाशंकर मिश्र : घराजवळ शॉपिंग मॉलमध्ये ओळखीचे भेटले, ते कुटूंबासोबत शॉपिंग करत होते, त्यांचा मुलगा १५ वर्षांचा असेल. तो अशी वस्तू मागत होता, जी त्यांच्याकडून सहज देणे शक्य नव्हतं, आणि ती त्याच्या उपयोगाची देखील नव्हती. ते त्याला समजवण्यात अयशस्वी झाल्यानंतर, त्यांनी ती वस्तू त्याला सहज देण्याचा निर्णय घेतला.
कारण त्यांच्या मुलाचं असं म्हणणं होतं की, त्यांच्या मित्राजवळ हा गेम आहे, आणि त्याच्याजवळ तो नसल्याने त्यात त्याला कमीपणा वाटतो. मित्रंही चिडवतात. जेव्हा मित्राने मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मित्राच्या पत्नीने मुलाची बाजू घेतली आणि सांगितलं, त्याचंही बरोबर आहे आणि बोनसंही आलाय ना.
मला पाहून वहिनी थोड्याशा सांभाळून हळूच म्हणाल्या, एकच तर मुलगा आहे, पण हे कधी समजूनच घेत नाहीत.
काही दिवसानंतर...
पार्किंगमध्ये...
याच मित्राच्या कारची साफसफाई करणाऱ्याने यांना सांगितलं, 'या महिन्यात कारसफाईचे ३५० रूपये, जरा अॅडव्हान्स द्या. दिवाळी आहे, मुलं हट्ट करतायत, यामुळे या महिन्यात अॅडव्हान्स द्यावा असं सांगतोय.'
कारची साफसफाई करणाऱ्याला उपदेश करण्याच्या नजरेत, थोडंस संतापात, 'अॅडव्हान्स तर कठीण आहे, आमच्याकडे दिवाळी देखील आहे, आणि हो जेवंढ अंथरूण असेल, तेवढेच पाय पसरावेत.'
मागणारा त्या साहेबाचं तोंड पाहतच राहिला. कशीतरी घाईगर्दीत त्याने गाडी साफ केली. गाडी साफ करण्यासाठी वापरलेल्या कपड्याला पाण्याने स्वच्छ केलं, आणि दुसऱ्या गाडीवर पाणी मारून गाडी पुसण्यास सुरूवात केली, पण त्याचे डोळे पाणावलेले होते.
तुम्ही मुलाचा हट्ट पूर्ण करा, यात काही वाईट नाही. हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. पण दुसऱ्याच्या वाटेला जर तुम्ही ३५० रूपयात उजेड देऊ शकतात, आणि हा उजेड आणखी वाढवू शकण्यात भूमिका पार पाडू शकतात. तर माझा असा सल्ला आहे, आपण असं करायलाच पाहिजे.
आपल्या वाट्याचा आनंद मिळवणे स्वाभाविक आहे. यात 'चार चाँद' तेव्हा लागतील, जेव्हा आपल्या आनंदाचा विचार करून, आपण दुसऱ्याचाही आनंद प्रकाशमान करू.
मला थोडं आश्चर्य झालं, कसे आपले विचार बदलून जातात, किती लवकर आपण अंतर कापतो, आपण, दुसऱ्यांच्या गरजेत, आपण स्व:तला योग्य ठरवण्याच्या नादात कसे कसे तर्क लढवतो, ज्यावर कोणतीही तोड नाहीय.
आपण आपल्या मुलाचा हट्ट हा, बिनकामाचा समजूनही पूर्ण करतो. दुसरीकडे आपले असे मित्र, आपलं जीवन सोप करणाऱ्यांना अशी गोष्ट सांगून जातात. ज्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं, एवढंच नाहीतर आपण एक कठोर, हिंसक जग बनवण्यात सहभागी होतो.
आपल्या उत्सवात असे रंग भरण्याचाही प्रयत्न केला पाहिजे, ज्यामुळे दुसऱ्याच्या वाट्याला आलेला आनंद, प्रकाश वाढेल. त्यांची अमावस्या देखील प्रकाशमान होवू शकेल. यामुळे असं जग शक्य आहे, जे आपल्याला जवळचं वाटेल.
ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com
पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4,
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)