नववर्षाच्या निमित्ताने मुकेश अंबांनींची जिओ युजर्ससाठी मोठी घोषणा, तब्बल 200 दिवसांसाठी....

Reliance Jio: ज्यांच्याकडे जिओ कंपनीचं सीम कार्ड आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओकडून युजर्सला नवीन वर्षाचं शानदार गिफ्ट देण्यात आलं आहे.   

Shivraj Yadav | Dec 27, 2024, 17:23 PM IST

Reliance Jio: ज्यांच्याकडे जिओ कंपनीचं सीम कार्ड आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओकडून युजर्सला नवीन वर्षाचं शानदार गिफ्ट देण्यात आलं आहे. 

 

1/8

Mukesh Ambani Reliance Jio: जर तुम्हीदेखील जिओ युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.   

2/8

मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने युजर्सला शानदार भेट दिली आहे.   

3/8

याअंतर्गत जिओ युजर्सला 2150 रुपयांचा फायदा मिळणार आहे. ही ऑफर जिओच्या 2025 रुपयांच्या प्लॅनसह येत आहे. यामध्ये युजर्सला वेगवेगळे फायदे मिळणार आहेत.   

4/8

या प्लॅनमध्ये किती फायदा?

या प्लॅनमध्ये किती फायदा?

रिलायन्स जिओच्या 2025 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते.   

5/8

या प्लॅनची ​​वैधता 200 दिवसांची आहे. याशिवाय युजर्सना प्रवास आणि फूड कूपन डिस्काउंट व्हाऊचर देखील दिले जातील.  

6/8

2150 रुपयांचे फायदे कसे मिळणार?

2150 रुपयांचे फायदे कसे मिळणार?

हा प्लॅन खरेदी केल्यावर, तुम्हाला Reliance Jio कडून EasemyTrip व्हाउचर मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही फ्लाइट तिकीट बुकिंगवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.   

7/8

याशिवाय, Ajio वर 2999 रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल. तुम्हाला Swiggy कडून 150 रुपयांचे व्हाउचर देखील मिळेल, ज्याद्वारे तुम्ही Swiggy वर डिलिव्हरी दरम्यान 150 रुपयांची सूट मिळवू शकता.   

8/8

ऑफरची वैधता:

ऑफरची वैधता:

ही ऑफर 11 जानेवारी 2025 पर्यंत वैध असेल. याचा अर्थ तुम्ही 11 जानेवारीपर्यंत 2025 रुपयांचा रिचार्ज केल्यास. त्यामुळे तुम्हाला 2150 रुपयांचा फायदा मिळेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x