दयाशंकर मिश्र : किती दिवस झाले, कुणासाठी काही लिहायला. हळू हळू आपण लिहण्यापासून लांब जात आहोत. आता सर्व लिखित, स्नेह संवाद एसएमएस, स्मायली, आणि व्हॉटस अॅप 'यूनिवर्सिटी'मध्येच वेळ जातोय. आम्ही जेव्हा लिहिण्याबद्दल बोलतो, तक केवळ यात एका पत्राचाही समावेश नसतो. यात पत्राचे सर्व प्रकार सामिल आहेत. ज्यात काही तरी विचार केला जात होता. एक शब्द लिहण्याआधी हजार वेळेस तो खोडला जात होता. लिहण्याच्या सर्व गोष्टींपासून आपण दूर जात आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पत्र कुठेच येत जात नाही. तुम्ही शेवटच्या वेळेस कुणाला पत्र लिहिलं होतं. कशासाठी लिहिलं होतं, नात्यांच्या ओलाव्याची आठवण करून देणारं कोणतं पत्र तुमच्याकडे आहे. ग्रिटिंग कार्ड देखील चालेल, नात्यांचा ओलावा हे पत्र कधीतरी सांगत होतं.


आपण आधुनिकतेच्या नावावर आपण संवादाचे पूल पाडून टाकले. पण नवीन पुल बांधण्यासाठी कोणतंही काम झालं नाही. असं यासाठी कारण आपणं सर्व काही बातचीतच्या विश्वासावर सोडून दिलं. आता ही बातचीत एवढी जास्त झाली की, ती आता अडचण झाली आहे.


मोबाईलवर टॉक टाईम कितीही फ्री झाला, तरी तो लिखित संवादाची जागा घेऊ शकत नाही. कुणाशी तरी बोलणे, आणि कुणासाठी काहीतरी लिहिणे, यात मोठं अंतर आहे, या अंतराला विसरलेला समाज आतून पोखरला गेला आहे. कारण नात्यांवर विचार करणं, आता संपत चाललं आहे.


आपल्या जुन्या मित्राने तुमच्याविषयी कोणत्याही पाच-दहा गोष्टी सांगा, जे तुमचं नातं सांगतील. तर तुम्ही थोडं थांबाल. विचार कराल, मग काहीतरी सांगाल. त्यानंतर सांगितलेल्या गोष्टीत आणखी बदल कराल. जितका वेळ हे सर्व काही होईल. तुम्ही आठवणीच्या गॅलरीत फिरून याल. एकमेकांना पत्र लिहिणे, ईमेल लिहिणे आणि कार्ड पाठवणे, हे असंच चालत असतं. पण याचा सर्व काही भार आता आपण एसएमएसवर टाकून दिला आहे.


यानंतर एक-दुसऱ्यासाठी भेटायला कमी झालेली वेळ, कारल्यावर कडुनिंबाचा मुलामा लावल्यासारखं आहे. आपण सोबत राहत आहोत, पण संवाद फारच कमी होत चालला आहे. आपण फक्त कॅलक्युलेशनची गणितं करत आहोत. जीवनाचा आनंद, चर्चेचा रस, प्रवासाचं सुख सुकलंय.
 
स्वप्नांत रममान होणं सर्वांना आवडतं, तसं असायला देखील हवं, पण प्रत्येक गोष्ट मर्यादेत असावी, यातील ताळमेळ बिघडू नये. रस्तायवर गाडी चालवताना रस्ता कितीही मोकळा असला, तरी एका मर्यादेपलिकडे वेग वाढवू नका असं सांगितलं जातं, कारण अपघात होण्यापासून वाचणे गरजेचे आहे.
 
हीच गोष्ट जीवनाला देखील लागू आहे. एक-दुसऱ्याशी संवादाच्या बाबतीत देखील लागू असली पाहिते. स्वप्न साकारण्यासाठी मेहमत घेणे १०० टक्के खरं आहे, पण कुटूंब, मित्र आणि शेजारी यांच्याशी नात्यांची किंमत काय असेल, हे ठरवणं देखील महत्वाचं आहे.


एकमेकांसाठी वेळ काढणे महत्वाचं आहे, कुटूंब, मित्र आणि सहकारी यांच्यासाठी काही लिहण्याची सुरूवात करायला हवी, विश्वास ठेवा, हे सुरूवातीला तुम्हाला जरा आश्चर्यकारक वाटेल, लहान मुलांसारखं वाटू शकतं, पण जरा आठवा, त्याच गोष्टी आज सर्वाधिक सुख देतात, ज्या मुलांप्रमाणेच असतात, तेच बालिशपणाचा जीवनाच्या रंगातून 'मिसिंग' आहे.


तणाव आणि डिप्रेशनशी लढण्यापेक्षा, महत्वाचं आहे, त्या चक्रव्यूहमध्ये फसण्यापासून वाचणं, उपायापेक्षा बचाव महत्वाचा आहे. पत्र आणि नात्यातील संवाद, एक दुसऱ्याच्या सुखाची, दु:खाची चाचपणी, हा बचावाचा भाग आहे.


या, मिळून या सुंदर जगासाठी एक मजबूत पाया बांधू या, जे आपल्या डोक्यात नेहमी असतं, पण आपण घरंट बनवण्याचं काम कधीच सुरू करत नाहीत.


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)


(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)