दयाशंकर मिश्र : चोहोबाजूला कर्णकर्कश आवाजाचा गोंगाट आहे. ओरडणारी वाहनं, आवाजाचा अतिरेक. शांततेच्या शोध जसं काही एक रॉकेट सायन्स झाल्यासारखी गोष्ट झाली आहे. एवढ्या गोंगाटात, त्याचा शोध घेणं, जो खोल कुठेतरी लपला आहे, फारच नाही पण अवघड तर नक्कीच आहे. आपल्या आत जे चाललंय, त्याची जाणीव होणे तेवढं कठीण काम नाहीय. फक्त ऐकण्यासाठी वेळ, जाणीवेची भावना प्रबळ असली पाहिजे. आम्ही आहोत कुठे आणि बुडतोय कुठे. बाहेर जे दिसतंय, ते मनातल्या आईसबर्गचा छोटासा भाग आहे. याला 'टिप ऑफ द आईसबर्ग'ने समजू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही जसे आहोत, त्याच्या मागे सर्वात मोठी भूमिका अंतर्मनाची आहे, ज्या गोष्टींमुळे आपलं अंतर्मन निर्माण होतं, त्याचा स्वाद, चव आणि प्रभाव आमच्या मनावर पडेल हे शक्य नाही. तयार जेवणाच्या चवीमागे काय आहे, त्याच्या चवीच्या मुळात तर तेच मसाले आहेत, जे जेवण तयार करण्यासाठी वापरले जातात. तसंच आपलं मन तयार होत आहे.


आपल्याला जे मन मिळालं आहे, खंर तर हे तयार मन आहे. प्रशिक्षित मन आहे. ज्याचं वय जेवढं, तेवढंच त्याच मन मजबूत आहे. सिमेंटच्या घरासारखं. अस मन दीर्घ काळापासून वेगळ्या अनुभवांनी, दुसऱ्याच्या धारणेच्या सानिध्यात राहून, खास करून 'पकलं' आहे. काही गोष्टींना घेऊन त्याचा दृष्टीकोन ठरला आहे. मन आपल्या प्रशिक्षणाच्या आधारावर पूर्वाग्रह तयार करून घेतं. यानंतर जीवनभर ते, आपल्या या पूर्वग्रहाच्या आधारावर चालत राहतं. याला सामान्य बोलण्याच्या भाषेवर बायस (BIAS) होणेही म्हणतो. ही एक प्रक्रिया आहे. निरंतर चालणारी.


फ्रायड सारखे जगातील अनेक मनोवैज्ञानिकांनी यावर आपलं सविस्तर मत मांडलं आहे. मनाचं निर्माण नेहमी व्यक्तित्वाच्या अनुसार व्हावं, हे काही आवश्यक नाही. पण जसं जसे आपण वयाचे टप्पे पार करत जातो, व्यक्तित्वावर मनाच्या बायसचा प्रभाव गडद होत जातो. आपले निर्णय, विचार-विनिमय यांची क्षमता हळू-हळू पूर्वग्रह (बायस)चा प्रभाव दिसू लागतो.


कुटुंबातील नात्यांमध्ये जी कटुता दिसत आहे, त्यात अधिक भर टाकली आहे, आपल्या पूर्वग्रहाने. आम्ही काही गोष्टींच्या बाबतीत, मत बनवण्यात एवढे अभ्यासू होत चाललो आहोत की, जास्त जोर आपलं आपण बनवलेल्या मतावर देत असतो.


याला एक सरळ उदाहरणाने समजून घेऊ या. आपण गाडीची सर्व्हिसिंग करत नाही आहोत. पण यातील अडचणीवर आपण तासंतास विचार करतोय. यामुळे आपल्याला अनेक अडचणी येत आहे. हेच आपण आपल्या मनासोबत करत आहोत. आपल्याला समजून घ्यावं लागेल, मन नेमकं कशामुळे चिंतीत होतंय. नात्यांमध्ये येणाऱ्या भूकंपाचं खरं केंद्र कोणतं आहे?, कोणतंही कारण समजल्याशिवाय आपण समस्या सोडवू शकत नाहीत. यासाठी हे महत्वाचं आहे की, मनापर्यंत जो कंटेन्ट पोहोचतोय, त्याला फिल्टर लावण्यात यावं.


ज्या गोष्टी आपल्या मनापर्यंत, डोक्यात येतात, त्यांचं फिल्टर करणे गरजेचे आहे. एक शांत, उदार, विवेकशील मनच हा निर्णय घेऊ शकतं. जे मन एखाद्या नात्याचं आधारस्तंभ आहे. शांती कोणत्याही जंगलात हिल स्टेशनवर नाहीय, ती आपल्या आत आहे. मात्र बाहेरच्या गोंगाटात ती हरवून गेली आहे. यासाठी त्या नात्यांमधील मळभ दूर झाली पाहिजे, जे तुमच्या संवादात, नात्यात अडथळा निर्माण करीत आहे. शायर सईदुद्दीन यांच्या यावर सुंदर ओळी आहेत...


'शोर कम करो 
आहिस्ता बोलो 
ताकि तुम्हारी आवाज़ 
कम से कम उन तक तो पहुंच जाए 
जो तुम्हें सुनना चाहते हैं.'


(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )


(https://twitter.com/dayashankarmi)


(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)