दयाशंकर मिश्र : काही लोकांशी बोलताना हे याचा अंदाज घेणं फार कठीण असतं, की ते किती आनंदी आहेत. त्यांचा चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसून येत नाहीत. अशा माणसांना तुम्ही देखील आयुष्यात कधी ना कधी भेटले असाल. अशी माणसं आपलं घर, परिवार, मित्र मंडळी अशा ठिकाणी असू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी माणसं सहसा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या फारच कामाची असतात. पण समाज, परिवार आणि स्वत:साठी ते किती सुखी आहेत, हे सांगणं फारच कठीण आहे.


जर सुखद गोष्टींवर तुम्ही आनंदी होत नाहीत, सात मजली हसत नाहीत. कोणत्याही गोष्टीवर तुम्ही चिंता व्यक्त करत नाहीत. तर याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही संयमी आणि स्थितप्रज्ञ आणि चिंतन करीत आहात.


आपण अनुभवासह मॅच्युरिटीकडे जात असतो. पण असं दिसून आलं आहे की, ही मॅच्युरिटी आपल्या व्यक्तीत्वाला बाधित करते. आपण सहज हसणं, रडणं विसरून जातो. याची मोठी किंमत आपल्याला आजारी मन आणि शरीराच्या रूपात चुकवावी लागते.


ग्वाल्हेरहून डिअर जिंदगीचे वाचक रमेश त्रिपाठी लिहितात. ते अशा बॉसच्या सानिध्यात जवळ जवळ २० वर्ष राहिले, जे ऑटोमॅटीक मशीनसारखे होते. त्यांचं सुख दु:ख सर्व मीटर कंपनीकडून ठरत होतं.


याचा परिणाम असा झाला की, त्यांचा स्वभाव हा जास्तच जास्त बॉससारखा झाला. त्यांच्या स्वभावातून सहज व्यक्त होण्याचा गुण निघून गेला. हळू हळू ते जीवनातील सर्वसामान्य निर्णय घेणेच विसरू लागले.


गंमतीची गोष्ट म्हणजे यानंतर ते सतत कंपनीसाठी उपयोगी होत गेले. कारण त्यांनी कंपनी आपली असल्याचा 'समज' करून घेतला, आणि मॅनेजमेंटचे निर्णय डोक्यात घेऊन बसले. असं नव्हतं की त्यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी वेळ नव्हता. पण त्यांनी जोखीमच्या जागेवर, सुरक्षित आणि टीकून राहण्याचं 'सुख' निवडलं.


भोपाळमध्ये आमचे एक ओळखीचे आहेत, त्यांना दोन मुलं आहे, दोन्ही मुलांशी त्यांचं पटत नाही. संपत्ती अजूनही मुलांच्या नावावर नाही. म्हणूनच की काय मुलं त्यांना तेथून अजून बेदखल करू शकत नाहीत.


एकाच घरात ३ स्वयंपाक घरं आहेत. यात वाईट काहीच नाही, पण मुलं आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना २ पैशांची मदत करणे तर दूर, पण हार्ट अटॅक आल्यावर लगेच उपचार करण्यासही तत्परता दाखवत नाहीत. हे आजीआजोबा दु:खी आहेत, पण तरी देखील आपल्या संपत्तीतून मुलांना बेदखल करण्याचा ते निर्णय घेत नाहीत.


कारण, त्यांच्या मनात सर्वात मोठी भीती ही आहे की, लोक काय म्हणतील?, खरं तर ही भीती नाही, तर हा रोग आहे. भारतातील सर्वात मोठा रोग हाच आहे की, 'लोक काय म्हणतील'. ज्यांच्या जवळ आपल्या दु:खात उभं राहण्याची शक्ती नाही, त्यांच्या मताला आपण एवढं महत्व का देतो, किंवा भीती का घेतो?.


नात्यात स्नेह, प्रेम आणि आत्मियता सर्वात महत्वाची आहे. काहीही झालं तरी या गोष्टीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण 'आपल्या' किंमतीवर नाही. कोणत्याही नात्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न झाला पाहिजे. पण तोपर्यंतच ज्यात त्यात तुम्ही स्वत:ला वाचवू शकतात.


जेव्हा तुम्हाला वाटेल की, या प्रवासात आता तुम्हाला वळणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या योग्य वाटेला जाणं योग्य असेल. याविषयी तुम्हाला निर्णय घ्यावाच लागणार आहे.


एखादी गोष्ट टाळून नका. जीवन अनंत नाहीय. यासाठी आपला वेळ, सुख आणि प्रेमाप्रति सजग, स्नेहिल आणि निर्णायक व्हा.



ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)



(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)