डिअर जिंदगी: ओरडण्यापेक्षा संकेत देण्यावर जोर द्या!
आपण कुणाचं ऐकून घेतो. आपलं, दुसऱ्याचं, मोठ्यांचं, प्रभावशाली व्यक्तीचं कुणाचं? हा एक प्रश्न आहे. आपण कुणाचं नेमकं ऐकतो, हे स्पष्ट सांगणे कठीण आहे.
दयाशंकर मिश्र : आपण कुणाचं ऐकून घेतो. आपलं, दुसऱ्याचं, मोठ्यांचं, प्रभावशाली व्यक्तीचं कुणाचं? हा एक प्रश्न आहे. आपण कुणाचं नेमकं ऐकतो, हे स्पष्ट सांगणे कठीण आहे. कारण आपल्या इच्छेसोबत अनेकांची मनं राखण्याची कामं आपण करतो. आपल्याला नेमकं काय हवं आहे, हे ओळखणे देखील सहज शक्य नाही. कारण कुणाची तरी इच्छा आहे, म्हणून आपल्या डोक्यावर अनेक अपेक्षांचं ओझं लादलेलं आहे. आपल्याला काय हवं असतं, ते आपण इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यापासून लांब जातो.
समाजाने लादलेल्या ओझ्याच्या अपेक्षांचा भाव आपल्या मनात एवढ्या खोलपर्यंत आहे की, आपल्याला नेमकं काय हवं आहे, तिथं पर्यंत आपण फार कमी पोहोचतो. आपलं लक्ष्य सोडून आपण दुसऱ्यांच्या आकर्षणामुळे भलतीकडेच भटकतो.
प्रत्येक गोष्टीला एक सीमा आहे. आपण पैशांना अधिक किंमत देणाऱ्या समाजाकडे जात आहोत. आपण आर्थिक नजरेने सर्वकाही पाहायला लागलो आहोत. यामुळे आपण आपल्या लोकांपासून दूर जात आहोत. आपल्या स्वप्नांना कशी गवसणी घालायची. डिअर जिंदगीच्या संवादात नेहमी असे प्रश्न युवकांकडून विचारले जातात. या प्रश्नापर्यंत पोहचण्याचं सरळ सूत्र आहे. आपल्याला काय हवं आहे. तुमची गरज काही असू दे, तुमच्या पालकांना काय वाटतं.
स्वप्न पाहताना आपण आपल्या यश मिळवण्याला एवढं महत्व देतो की, ते मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला काय हवं होतं तेच विसरून जातो. आपण ते स्वप्न निवडतो, ज्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे, किंवा जे आपल्याला हवं होतं. या दोन्ही गोष्टी अतिशय वेगवेगळ्या आहेत.
पालक आपल्या मुलांना दिशा सांगताना, सर्वात मोठी चूक ही करतात की ते ट्रेन्डवर अधिक जोर देतात. नवं करणे, साहस दाखवणे आणि संयम ठेवण्याच्या जागी, मुलांना अशा गोष्टींच्या मागे पळायला भाग पाडतात, ज्या गोष्टी त्या वेळी ट्रेन्डमध्ये असतात. जे आईवडील ट्रेन्डपासून लांब राहतात, ते आपली स्वप्न आपल्या मुलांमध्ये पाहतात.
इशा नायकचे वडील शिक्षक आहेत, ते शास्त्रज्ञ बनवू इच्छीत होते, पण तसं झालं नाही. आता त्यांना असं वाटतं की, आपली एकुलती एक मुलगी नासामध्ये जायला हवी. यामुळे आपल्या परिवाराचं नाव मोठं होईल. पण इशाला असं वाटतं नाही, इशाला तेच व्हायचंय जे इशाला वाटतंय.
इशा आणि तिच्या वडीलांच्या स्वप्नात जे अंतर आहे, ते पूर्ण भारतीय समाजातील अंतर आहे. हेच मन जीवनात वाढता तणाव आणि नैराश्याचं कारण आहे. आईवडीलांच्या दबावात किंवा आदर ठेवण्यासाठी मुलं आपली स्वप्न बाजूला ठेवून, त्यांची स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी लागतात, त्यांची वाट कधी आईवडीलांच्या स्वप्नांच्या दिशेने जाते ते त्यांना कळतंही नाही.
आमीर खानचे मुलं आणि युवकांच्या स्वप्नावर आधारीत ३ चित्रपट आहेत. दोन्ही विरोधाभासी आहेत, जीवनाच्या अर्थविषयी. समाजाला काहीतरी देण्याचा त्याच अर्थ आहे.
‘थ्री इडियट’ आणि 'दंगल'. ‘थ्री इडियट’मध्ये म्हटलंय, आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याआधी जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या पसंतीनुसार करिअर निवडलं पाहिजे. तर दुसरीकडे दंगलचा अर्थ असा आहे की, वडीलांची निवड योग्य आहे.
वडील आपल्या स्वप्नासाठी मुलांना एखादं टूल समजतात. तसेच आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात, आपली सर्व ताकद पणाला लावतात.
हे उदाहरण जरी चित्रपटातलं असलं, तरी जीवनावर याचा एक उदाहरण म्हणून मोठा प्रभाव आहे. आपण म्हणू शकतो की, थ्री इडियटने मुलांना, त्यांच्या युवा मनाला प्रकाश दिला, 'दंगल' त्याची एक बंद गल्ली आहे.
परीक्षांची घोषणा आणि सोबत निकाल यानंतर आता अशी वेळ सुरू होणार आहे, ज्यात स्वप्न विनण्याचं काम अधिक सजगतेने करण्याची गरज आहे. आपण फक्त केवळ एवढा प्रयत्न केला पाहिजे की, आपला मुलगा त्याच्या स्वप्नाकडे पूर्ण क्षमतेने पुढे गेला पाहिजे.
लक्षात ठेवा, मुलांना ट्रेंडकडे ढकलू नका. पण त्याकडे जाण्यासाठी मदत करा, ज्याकडे तो कोणत्याही अपेक्षा आणि भीतीशिवाय जावू इच्छीतो. मुलांना आपल्याला यशस्वी होण्याच्या गोंगाटाकडे ढकलायचं नाहीय. तर त्याचं मन, शक्ति आणि क्षमतेचा संकेत जेवढा शक्य असेल, तेवढा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com
पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4,
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)