दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगीच्या वाचकांना हे सांगण्यात आनंद होत आहे की, हिंदी, मराठी, गुजराती आणि बंगाली भाषेत, ज्या आत्मियतेने डिअर जिंदगी वाचलं जातं, त्या प्रमाणेच या संवादाची आमंत्रण आता हिंदी प्रदेशाच्या बाहेरून देखील मिळत आहेत. डिअर जिंदगीसाठी आठ जानेवारीचा दिवस तेवढाच महत्वाचा होता. मुंबईच्या प्रसिद्ध, ‘रामनारायण रुईया आर्ट अॅण्ड सायन्स कॉलेज’मध्ये जीवन संवादासाठी आमंत्रण आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संवादात विद्यार्थी-विद्यार्थींनींसह शिक्षकांना सहभाग घेतला होता. यात डिप्रेशन आणि आत्महत्या विरूद्धच्या प्रयत्नांना मोठी शक्ती मिळाली. या संवादात ज्या दोन विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला, त्यातील एकाला दिसत नाही. या विद्यार्थ्यांची जीवनातील दृष्टी आणि समज पुरेशी आहेय आपला कथित डोळस समाज यापुढे काहीच नाही. मनुष्याची दृष्टी एका योग्य दिशेने गेली, तर तो सतत पुढे सरसावत असतो.


या यात्रेत सर्वात जास्त युवा मनासोबत, प्रेम, विवाह आणि नात्यांवर बोलणं झालं. यातील एका टोकावर म्हणजेच विवाहावर काही बोलू या.


लग्नाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन अजूनही तोच आहे. खरंतर जग एका बाजूला बदलत चाललं आहे. समाज, स्त्री, पुरूष आणि परिवार देखील. एकमेकांवर प्रेम करा, पण प्रेमाला बंधन समजू नका. वीणाचे तार जरी वेगवेगळे असले, तरी एका सुरात त्यांचे सूर निनादतात. स्वतंत्र असूनही एकममेकांची साथ देण्याचा आनंद सर्वश्रेष्ठ जीवन आहे.


पारंपरिक विवाह, परिवारासाठी मोठी समस्या आहे. यात घर चालवण्याची जबाबदारी महिलेवरच आहे. पुरूषांना काही प्रमाणात आर्थिक जबाबदारीशी जोडण्यात आले आहे. काळानुसार यापूर्वीही ही गोष्ट ठीक असू शकते, पण आता हे विचार काळानुसार बदलत आहेत.


आपण जीवनात मागील १० वर्षापासून पैशाला अधिक महत्व देण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत आमच्या संवादाचा भाग असलेल्या एका विद्यार्थीनेने सांगितलं की, तिच्या वडिलांनी तिच्या बहिणीसाठी आलेल्या प्रेम विवाहाच्या प्रस्तावाला, मुलाचं स्वत:चं मुंबईत घर नाही, म्हणून नाकारलं. त्यांच्याजवळ त्यांच्या मुलीच्या प्रश्नाचं मात्र उत्तर नव्हतं, कारण आजही या मुलीचे बाबा देखील भाड्याच्या घरात राहत होतेय वडीलांनी सांगितलं, जो त्रास मला होत आहे, तो माझ्या मुलांना व्हावा, अशी माझी इच्छा नाही.


चिंता बापाला नसावी, तर कुणाला असाली. आपल्या मुलीच्या भविष्याचा सर्व भार, ते एकट्या मुलावर, त्यांच्या मुलीवर प्रेम करणाऱ्या मुलावर कसे टाकू शकतात. तसं पाहिलं तर मुंबई सारख्या शहरात मध्यमवर्गीय परिवारासाठी घर घेणे, हे एक स्वप्नपूर्तीसारखंच आहे. वडील मात्र मानत होते, यानंतर मुलाने घरच्यांच्या मदतीने मुंबईत घर घेतलं आणि लग्न देखील झालं.


हा किस्सा सांगणाऱ्या मुलीने सांगितलं, माझ्या बहिणीच्या नवऱ्याने हे करून दाखवलं. पण मी तिला हे सांगितलं की, ही काही मोठी गोष्ट नाही, ही बाब मोठी तेव्हा झाली असती, जेव्हा मुलगा घर घेऊ शकला नसता, तर मग काय त्यांचं प्रेम कमी झालं असतं.


लग्नात थोपवलेल्या अटीचं काही महत्व नाही. जोपर्यंत युवक या कागदी, एकतर्फी व्यवस्थेचा विरोध करत नाहीत. जीवनात नवी उर्जा येणे शक्य नाही. प्रेम एकदम साथी सोपी गोष्ट आहे. जसं सरळ होणं फार कठीण आहे, तसं प्रेमाला समजणं देखील.


प्रेम, लग्न आणि जीवन अतिशय सरळ साधी गोष्ट आहे. बस यात तसुभरही भेसळ नको. भेसळ झाली तर अमृत देखील अमृत राहत नाही.


ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)