दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगीच्या काही लेख प्रकाशित झाल्यानंतर या प्रवासाला १ वर्ष पूर्ण होणार आहे. एका वर्षात आपल्याशी संवाद साधण्यासाठी जी संधी मिळाली, त्यामुळे मला काही विषयांबदद्ल विचार करण्याची, समजण्याची, आणि निर्णय घेण्यासाठी एक नवा दृष्टीकोन मिळाला. रविवारी पाटण्याहून एका वाचक रमेश कुमारने लिहिलं आहे, 'आम्ही वस्तूंना स्पर्श केल्याशिवाय जगत आहोत, आम्ही वस्तू जमवतोय, पण त्यांच्यासोबत जगत नाहीत. आमच्याकडे जगण्यासाठी वेळ नाही, या गोष्टी भौतिक गरजा होत्या, पण झालं असं की नात्यांना देखील आपण या श्रेणीत बसवलं'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रमेश कुमार यांनी आपल्या सर्वांच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला. हा किस्सा जरा असा समजून घ्या, समजा एक शिक्षक आहे, शाळेत मुलांना समजावतो, की परिवारासोबत राहणे गरजेचे आहे. तसेच आईवडिलांचा मुलांबरोबर आणि मुलांनी आईवडिलांबरोबर वेळ घालवणे अत्यंत गरजेचे आहे. पण ही मुलं जेव्हा आपल्या घरी पोहोचतात, तेव्हा सर्वात आधी मोबाईल फोनमध्ये व्यस्त होतात. स्मार्टफोनवर ते शाळेचं काम नाही करत, जगाशी जोडले जातात. मोबाईलने चॅटवर मित्रांशी बोलत असतात, मुलं स्वत: त्यांचे आईवडील त्यांच्या मागे धावत असतात की केव्हा त्यांना परिवारासाठी वेळ मिळेल.


परिवारासाठी वेळ नाही, मित्रांसाठी वेळ नाही, नातेवाईकांसाठी वेळ नाही, तर हा वेळ नेमका जातो कुठे? कोण याला सोकावतं आहे. हे फक्त स्मार्टफोनमुळे होत नाहीय. याचं सर्व खापर मोबाईलवर फोडता येणार नाही. यापेक्षा अधिक जबाबदारी आपल्यावर झालेल्या संस्कारांची आहे. कशा वातावरणात आपण वाढलो, आता आपल्या मुलांना आपण कसं पालन-पोषण करून मोठं करतोय, यावरंच हे सर्व अवलंबून आहे.


आम्ही रात्रंदिवस मुलांना आपल्यावर फोकस करण्याचा धडा शिकवत आहोत. यावरून कशी अपेक्षा करू शकतो की, ते सोशल होतील. आम्हीच मुलांना रोबट बनवण्याच्या मोहिमेत लागलो आहोत. यात दु:खी नीरस आणि एकाकी पडणारा समाजच तयार होईल. एकमेकांत न मिसळता मुलं घरात बंद असले तर त्या कैदेत ते नीरसच दिसतील. मोबाईलने वेढले गेलेले आणि कार्टुन कॅरेक्टरशी रिलेशन पार पाडताना, मुलं मानव आणि मानवतेपासून दूरच जाणार, त्यांच्याजवळ त्यांचे शेजारी तर दूर, पण परिवारासाठी भावना देखील कमी होणार आहेत. कारण ते एकमेकांच्या अस्तित्वाचा अनुभव घेत नाहीयत. आपण स्वत: बद्दल विचार करायला सुरूवात करतो आणि हा विचारच स्वत:ला संपवून टाकतो.


चार्ली चॅपलिनने लिहिलं आहे. आम्ही खूप विचार करतो, पण आपल्याला जाणीव फार कमी असते, आणि आपली जाणीव कमी होते, कारण आपण निसर्ग आणि मानव यापासून लांब जात आहोत. खरं तर आपण स्वत:पासून पळत आहोत, आणि सतत पळत असणाऱ्याजवळ कुणासाठी वेळ नसतो, स्वत:साठी देखील नाही. म्हणून त्याला जाणीव होत नसतानाही तो जगण्यासाठी अभ्यस्त होतो. कारण त्यांचं लक्ष कुठं दूर आहे, कुठे आहे, त्यालाही माहित नाही, कारण त्याने हे जाणवण्यावर कधीच लक्ष दिलं नाही.


(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )


(https://twitter.com/dayashankarmi)


(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)