कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई: कागदाचा वापर हा संपुर्ण जगभरात करतात. कागदाचा वापर हा आपण नेहमी करत असतो. मुलांच्या शिक्षणात असो या बँक ऑफिस किंवा व्यापारातसुद्धा कागदाचा वापर करतात. पूर्वीच्या काळी कागद बनविण्यासाठी गवत, लाकूड, कच्चामाल, सेल्युलोज या घटकांचा वापर करत असत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कागदाचा शोध हा चीनमध्ये लागला होता. हान काळात लगद्यापासून कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या सुरुवातीस विकसित केली गेली. रेशम फार महाग असल्याने दुसरा पर्याय म्हणून कागदाचा वापर चीनमध्ये केला गेला.



त्यापूर्वी लेखनासाठी हाडे, कापड, बांबू, लाकूड या वस्तूचा वापर करत असत. यानंतरच्या काळात इजिप्तमध्ये पेपर बनविण्यासाठी पापयरस या वनस्पतीचा उपयोग केला जायचा.  


ही वनस्पती नाईल नदीच्या काठी उगवली जात होती. या झाडाच्या नावावरूनच पेपर नाव ठेवण्यात आले होते. प्रारंभिक काळात लेखणासाठी रेशमचे तुकडे आणि बांबू उपयोग केला जात असत. त्यावेळी रेशम फार महाग होते. बांबू हा वजनदार असल्याने त्याचा वापर व्यवहार्य नव्हता.


त्यावेळी काई लुन यांनी विचार केला की, एक असा कागद आपण बनवायला पाहिजे की, जो स्वस्त आणि हलका असेल आणि ज्यावर लिहणंही सोईस्कर असेल असा विचार काई लुन यांनी केला. या काळातला कागद हा चमकदार, मऊ, गुळगुळीत आणि लवचिक असे. हळूहळू संपूर्ण जगात कागदाचा वापर वाढत गेला.


सुरूवातीला कागद बनविण्यासाठी झाडाच्या सालीचा वापर केला जात असे. फारपूर्वी झाडांच्या सालींना पाण्याबरोबर मिसळून एक मिश्रण तयार केले जात असे. हे मिश्रण चाळून घेतल्यानंतर वाळवले जात असे. यासाठी वेगवेगळ्या झाडांचा वापर केला जात असे.



नंतरच्या काळात कागद्याच्या साच्यामध्ये खूप बदल झाला. त्यामुळे पेपर तयार करण्याच्या पद्धतीतही बदल झाले. कागद आणखी चांगला बनत गेला. 


सुरूवातीला चीनने त्यांच्या या आविष्कारबद्दल कुठल्याही देशाला सांगितले नव्हते. भारतात सातव्या शतकात कागदाचा शोध लागला होता. मात्र कागद हा भारतात व्यापकपणे पसरला नव्हता. संपूर्ण भारतात कागदाला व्यापकपणे पसरण्यासाठी बाराव्या शतकातपर्यंत वेळ लागला. 


त्यानंतर कागदाचा वापर हा भारतात होत गेला. भारतामधील पहिली कागदाची मिल ही १०० वर्षांपेक्षा जुनी आहे. याची सुरूवात शेरोपूर पश्चिम बंगालमध्ये १८१२ मध्ये झाली होती. 


इसवीसन ११०० साली उत्तर आफ्रिकेत कागद निर्मिती होत गेली. त्यानंतर इसवीसन ११५० साली स्पेनमध्ये आणि युरोपातही कागद उद्योगला सुरूवात झाली. १४५३ साली युआन गुटेन बर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.



उत्तर अमेरिकेत पहिला कागदचा उद्योग फेला डेल्फियामध्ये १६९० साली सुरु झाला. १८३० ते १८४० दशकाच्या जर्मन संशोधक एफ.जी. केलर आणि चार्लस फेनेर्टी लाकडावर प्रक्रिया करून लगदा बनविण्याची पद्धत शोधून काढली होती. त्यांनी कागद बनविण्यासाठी वेगळ्या तंत्रज्ञाचा वापर केला होता. त्यावेळी त्यांनी एक मशीन सुद्धा तयार केली होती. ज्यातून लाकडामधून तंतू वेगळे केले जात असत. चार्लस फेनेर्टी यांनी कागदाला पांढरा रंग देण्यासाठी ब्लिचिंगच्या प्रक्रियेचा शोध लावला.