शरीरातील 'या' 5 लक्षणांमुळे कळतं शिरांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमलंय! हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी घ्या काळजी

Cholesterol signs : शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराच्या झटक्या येण्याची भीती असते. त्यामुळे शिरांमध्ये खराब कोलेस्टॉल जमलं असेल तर तुम्हाला काही लक्षणं दिसतात. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. 

| Nov 25, 2024, 20:50 PM IST
1/7

उच्च कोलेस्टेरॉल हा एक गंभीर आजार असून याची लक्षणं सुरुवातीला दिसत नाहीत. पण कालांतराने त्याची लक्षणं शरीरात दिसून येतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्या आरोग्याला घातक ठरु शकतं. 

2/7

कोलेस्टेरॉलच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. शिवाय पक्षाघाताचा ही धोका असतो. त्यामुळे खालील पाच लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

3/7

जेव्हा शरीरात वाईट कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते, तेव्हा अर्धे किंवा संपूर्ण डोके दुखण्यास सुरुवात होते. उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांनी या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये कारण नंतर या लक्षणांमुळे स्ट्रोक येण्याची भीती असते. 

4/7

उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये छातीची काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे ही काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे. 

5/7

जेव्हा खराब कोलेस्ट्रॉल शरीरात जमा होऊ लागतं तेव्हा तुमच्या डोळ्यांखाली पांढरे डाग पडू लागतात. अशा वेळी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

6/7

शरीरात उच्च कोलेस्टेरॉल वाढल्यास, श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास फुलने किंवा श्वास घेताना इतर कोणत्याही प्रकारचा त्रास होणे हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. याशिवाय, हे इतर अनेक गंभीर आजारांचे लक्षण देखील असण्याची दाट शक्यता आहे. 

7/7

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनीही अशा लक्षणांची काळजी घ्यावी. कारण अचानक खूप थकवा येणे किंवा अशक्त वाटणे हे उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असून गंभीर आजाराचे लक्षणं आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)