मुंबई : राहीलेल्या माझ्या तमाम शैनिकांनो,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय तो खरतर या क्षणाला माझ्यासमोर एकच पर्याय आहे.. खरतर मी तोंड दाखवू शकत नाही, आणि तोंड न दाखवता बोलायचं हे एकच माध्यम आहे.. त्यामुळे मी जे बोलेलं  आणि तुम्हाला जे आवडेल तिथे कमेंटमध्ये तुमच्या तुम्ही टाळ्या टाका..


आज जे काही वादळ दादरपासून बेलापुरच्या कोकणभवनपर्यंत घोंघावले हे अवघ्या महाराष्ट्रकराने पाहिलं. खरतर वादळ गेलं कुठे आणि बीएमसीच्या दरवाजे का लावले हा प्रश्न खरतर मलाच पडला. पण असो कारण सगळ्यांना ठाऊक आहे. बाहेर वादळ असताना मी शांत असतो, आणि मी बाहेर पडल्यावर वादळ पुन्हा निर्माण करतो. खरतर आज ना उद्या हे होणारच होतं, आणि तसंही मला हे मान्य नव्हतच.. एक धोरण, एक इंजिन, एक आमदार असताना, सात सात नगरसेवक हवेच कशाला.. मी स्वता एकहाती सत्ता मागतोय याचा अर्थ मला दोन हातांचा एकच नगरसेवक होता. तरी पण मी वारंवार तुमच्याशी बोलतोय. पण तुम्हाला समजून घ्यायचच नसेल तर मला स्वताहून यात मार्ग काढावाच लागला. जे काही झालय ते झालय पण मी आजही माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. आज मी तुमच्याशी संवाद साधताना जे बोलणार आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.. अवघ्या मुंबईला माहित आहे,  मी सात मागत होतो. तुमच्या राजाला सात सात द्या, पण तरीही त्यांनी स्वताचा डाव टाकला.. त्यांनी आठ  (ही शब्दांची कोटी आहे....) दिले.. मी याचेही कागद सादर करेन.. खरंतरं मला या पाडापाडीच्या राजकारणाचाच किरीट आलाय.. सॉरी वीट आलाय.


लक्षात ठेवा, मी आणि माझ्या पक्षाची इंग्रजी वर्तमानपत्रात तीच हेडलाईन येणार, पार्टी वॉज फिनीश.. पण जिथं फिनीश म्हणून जग ओरडतं तेव्हा मी एकटा उभा असतो. एका नगरसेवकासह आणि एका आमदासह मी पुन्ही एकटा फिरेन.. आणि आज फक्त एवढचं सांगेन, अजुनही एक शिल्लक आहे. आणि एकाच्या बळावर मीच रिमोट कंट्रोल ठरेल.. माझी लढाई एकट्याचीच आणि ती एकालाच घेऊन लढायची असते. 


तुमचा येकांडा शिलेदार