जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : विदर्भच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड विषारी किटकनाशकांमुळे, पिकांवर फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना जीवाला मुकावं लागतंय. यावरून मला एका विषारी भेंडीची गोष्ट आठवली.


अंगावर काटे असणाऱ्या भेंडीची थरारक गोष्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांपूर्वी आईने ती वास्तवातली गोष्ट मला सांगितली होती, मी आता पुन्हा आईला एवढ्या वर्षांनी फोन करून ते विचारलं की, 'तू मला विषारी भेंडीची गोष्ट सांगितली होती, तुझ्या आईकडच्या नात्यातली'.


ही सत्य कथा अनेकांचे डोळे उघडू शकते


मला ती गोष्ट पुन्हा एकदा आईकडून ऐकायची होती, पुन्हा ऐकण्याचं कारण होतं, लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवणे. कारण ही सत्यकथा तेवढीच हादरवून टाकणारी आणि धक्कादायक आहे.


साधारणत: 5 वर्षापूर्वीची सत्य घटना


जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील साधारणत: 5 वर्षापूर्वीची ही घटना आहे. आई आणि तिच्या 21-22 वर्षाच्या मुलाने आपल्या शेतात भेंडी लावली होती.


शेतातील भेंडीच्या पिकाची सर्व काळजी घरातील हा लहान मुलगा घेत होता. शेत लहान असल्याने, पैसा जेमतेम असल्याने बऱ्याच वेळी घरच्या घरी भेंडीची तोडणी व्हायची.


कमी वेळेत रोख पैसा, म्हणून सतत भेंडीची लागवड


भेंडीवर औषध फवारण्याचं काम ही हा 21 वर्षांचा मुलगा करत होता. भेंडची तोडणी आई आणि मुलगा करत असे. भेंडींचं पिक ही 2-3 वर्षांपासून ठरलेलं होतं. येथील भेंडी नवी मुंबईच्या वाशी मार्केटला जात होती. भेंडीत तसा इतर पिकांपेक्षा जास्त आणि कमी वेळेत जास्त, रोख पैसा दिसत होता.


विषारी भेंडी एवढा मोठा दगा देऊ शकते?


मात्र अचानक या शेतात काम करणाऱ्या तरूणाची तब्येत काहीशी बिघडली. तब्येत बिघडण्याचं कारण नेमकं कळत नव्हतं. कर्ता मुलगा आजारी पडल्याने, भेंडीच्या उत्पन्नातून आलेले पैसे खर्च होत होते. अखेर या तरूणाचा एकेदिवशी मृत्यू झाला.


शेताला सुट्टी नसते, आणीबाणीत 5 दिवस


तरूण मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरणं, या मुलाच्या आईलाही कठीण झालं होतं, शेतकऱ्याच्या घरी, जन्म-मृत्यू, सण असला तरी शेतावर जाण्याशिवाय पर्याय नसतो, काही दिवसांनी पुन्हा भेंडीची शेती, पुन्हा फवारणी, पुन्हा तोडणी...


ही विषारी भेंडी कुणाच्या नशिबात येऊ नये


या बाबतीत असं म्हणतात, की त्वचेकडून, श्वसनमार्गाने हळूहळू विष आणि रोज विषाशी येणारा संपर्क, हात साबणाने स्वच्छ धुतले तरी शेतात जेवताना, पाणी पिताना होणारं 'स्लो पॉईझन' आई आणि मुलाला हळूहळू आतल्या आत मारत होतं. 


एवढं दुर्देवं कुणाचंच नसावं, पण आईआधी, तरूण मुलगा गेला आणि नंतर आईचाही मृत्यू झाला.