डिअर जिंदगी : माफीचा अधिकार वापरला असता तर बरं झालं असतं!
माफी मिळणे हे तुमच्या हातात नाही, पण माफ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या अधिकारापासून स्वत:ला वंचित ठेवू नका!
दयाशंकर मिश्र : 'डिअर जिंदगी' लिहिताना जे ईमेल, पत्र आणि मेसेज येतात, यात एकमेकांना माफ न करण्याच्या वेदना जास्तच जास्त वाचक मांडत असतात. काही वाचक लिहितात किती बरं झालं असतं, जर त्याला माफ केलं असतं!
यात काही असे आहेत, जे मैत्री तुटल्यानंतर कधीच भेटले नाहीत. काही अचानक जग सोडून गेले. रागावून काही इतके दूर गेले की, त्यांना माफ करण्याची संधी पुन्हा मिळालीच नाही. नात्यांचा 'पूल' जीवनाची मोठी परीक्षा पार तर करतात. पण नदीचं थोड़ंस पाणी पुलावर आलं, तर मग नात्याच्या पुलाला तडा जातो.
एक अशाच प्रसंगात आपल्या वाचकाने एक किस्सा सांगितला. भारतीय सिनेमाचे सुपरस्टार राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या मैत्रीचा, शत्रुघ्न सिन्हा आपली बायोग्राफी 'एनीथिंग बट खामोश' लिहिताना म्हणतात, ते आपल्या एकेकाळचा सर्वात जवळचा मित्र राजेश खन्ना विरोधात निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते. पण भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ते नकार देऊ शकले नाहीत. ते अडवाणी यांना आपले मार्गदर्शक आणि गुरू मानत, त्यामुळे त्यांचा शब्द त्यांना पाळावा लागला.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सोमाया यांनी काही दिवसांपूर्वी रेडिओवर ऐकलेला किस्सा सांगितला, राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या निखळ मैत्री होती, ही बाब बॉलीवूडमध्ये सर्वांना माहित होती. पण ही मैत्री अचानक तुटली, कारण शत्रुघ्न सिन्हा यांनी राजेश खन्ना यांच्याविरोधात १९९२ मध्ये दिल्लीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना असं न करण्याचा सल्ला दिला, कारण यामुळे बॉलीवूड दोन गटात विभागण्याची भीती होती. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी नाही ऐकलं. ते लढले, यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला.
शत्रुघ्न राजेश खन्ना यांच्याविरोधात निवडणुकीत पराभूत झाले.
राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मैत्री कायमची तुटली. राजेश खन्ना यांनी याविषयी शत्रुघ्न सिन्हा यांना कधीही माफ केलं नाही.
हे डिअर जिंदगीचं हे सदर लिहिण्याआधी, मी शत्रुघ्न सिन्हा यांचं यूट्यूब चॅनेलवर काही व्हिडीओ पाहिले. ज्यात ते आपल्या विरोधात निवडणूक लढणारे अभिनेता शेखर सुमन यांना माफ केल्याचं म्हणतायत, आणि पुन्हा मैत्री अधिक गडद होत असल्याचं दिसतंय. पण याच व्हिडीओ ते आणखी दु:खी होतात, आणि सांगतात की, कसं एका राजकीय निर्णयाने त्याचा खरा मित्र कायमचा हिसकावून घेतला.
शेखर सुमन यांचा शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी तेच मैत्रीचं नातं आहे, जे कधी तरी शत्रुघ्न सिन्हा आणि राजेश खन्ना यांच्यात होतं. या नात्याला तडा गेला तो एका निवडणुकीने. तर दुसरीकडे शेखर सुमन यांच्या प्रयत्नानंतर, आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखवलेलं मोठ्या मनामुळे, शेखर आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मैत्री अबाधित ठरली.
मी ज्या व्हिडीओंबद्दल बोलतोय, यात शत्रुघ्न राजेश खन्ना यांच्याशी मैत्री तुटण्यावर बोलत होते, त्यांच्या मनात याविषयी मोठी सल दिसत होती. ही घटना अधिक विस्ताराने भावना सांगत होती.
शत्रुघ्न सिन्हा यांनी ही मैत्री जोडण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्या निवडणुकीनंतर राजेश खन्ना कधीही शत्रुघ्न सिन्हा यांना भेटण्यास तयार झाले नाहीत. एवढंच काय, तर राजेश खन्ना जेव्हा जास्त आजारी होते, तेव्हा देखील ही भेट शक्य झाली नाही.
या बाबतीत आजही शत्रुघ्न सिन्हा यांना मोठं दु:ख आहे. यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, 'जेव्हा राजेश खन्ना आपल्यात नाहीत, जेथे कुठे असतील, तेथे त्यांना वाटत असेल, माफ केलं असतं तर बरं झालं असतं'
हा किस्सा सांगताना दोन गोष्टी सांगू इच्छितो, माफीला नेहमी दोन बाजू असतात. पण ती बाजू अधिक सुखावह असते, जो बाजूचा माणूस माफ करतो. याविषयी त्याच्या मनाला आनंद असतो.
माफी मिळणे हे तुमच्या हातात नाही, पण माफ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या अधिकारापासून स्वत:ला वंचित ठेवू नका!
ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com
पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4,
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)