धनंजय शेळके, प्रतिनिधी, झी २४ तास, मुंबई : निवडणूक कोणतीही असो, दिल्लीतली किंवा गल्लीतली असो, निवडणूक काळात पक्षांतराचं वारं मोठ्या प्रमाणात वाहत असतं. कुठे ते घाऊक प्रमाणात होतं तर कुठे छोट्या प्रमाणात. देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा (5 State Election 2022) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात पक्षांतरे होत आहेत. पण यूपीमधील पक्षांतराची (Defection In Uttar Pradesh Before Elections 2022) सर्वाधिक चर्चा सध्या सुरू आहे. (uttar pradesh elections 2022 know about how much will effect on bhartiya janta party due to many leaders defection before election in state)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का होत आहे यूपीतील पक्षांतराची मोठी चर्ची? 


उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तिथे 80 खासदार आहेत. पंतप्रधानपदाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्यामुळेच इथल्या विधानसभा निवडणुकीची आणि पर्यायाने इथल्या पक्षांतराची मोठी चर्चा सुरू आहे. दुसरं कारण म्हणज्ये 2014 च्या नंतर देशभरात भाजपमध्ये इनकमिंग सुरू होतं. 


पहिल्यांदाच भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू झालं आहे. भाजपच्या दृष्टीने आणि आणि देशाच्या राजकारणाच्यया दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे सगळीकडे या पक्षांतराची मोठी चर्चा सुरू आहे.


उत्तर प्रदेशात आतापर्यंत म्हणजे 15 जानेवारी 2022 च्या दुपार पर्यंत भाजपाच्या 3 बड्या मंत्र्यांनी आणि काही आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. आणखी काही मंत्री आणि आमदार भाजपातून समाजवादी पार्टीत जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपातून समाजवादी पार्टीत आलेल्या एका आमदाराने तर भाजपाचे जवळपास 100 आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा केला आहे.


आऊटगोईंगमुळे भाजपला किती बसू शकतो फटका? 


भाजपमधून आतापर्यंत स्वामी प्रसाद मोर्या  (Swami Prasad Maurya), दारासिंग चौहान(Dara Singh Chauhan), धर्मसिंग सैनी (Dharam Singh Saini) या तीन मंत्र्यांनी आणि काही आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. हे तीनही मंत्री ओबीसी आहेत. प्रत्येकाची त्यांच्या भागात त्यांच्या समाजावर चांगली पकड आहे. तीनही जण त्यांच्या पॉकेट्समध्ये निवडणूक निकालावर परिणाम करु शकतात असंही बोललं जातंय.


भाजपनं 2014 च्या निवडणुकीपासून उत्तर प्रदेशात प्रत्येक निवडणुकीत एक सुनियोजीत स्ट्रॅटर्जी वापरु विजय मिळवलेला आहे. अर्थात भाजपच्या विजयात सर्वात मोठा घटक राहिला तो म्हणजे नरेंद्र मोदींच्या इमेजचा. त्यानंतर पक्षाचं संघटन, अमित शहांचं बूथ लेवलपर्यंतचं नियोजन, सघांची मदत हे घटक तर महत्वाचे होते आणि आहेतही. पण त्याचबरोबर यादव सोडून इतर ओबीसींचं संघटन करण्यावर भाजपनं भर दिलेला आहे.


उत्तर प्रदेशात यादव सोडून जवळपास 35 टक्के इतर ओबीसी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हे 35 टक्के ओबीसी भाजपची व्होटबँक झाली होती. हे 35 टक्के मतदार आणि ब्राह्मण, ठाकूर आणि इतर उच्चवर्णीय मते हे भाजपच्या उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचा हिट फॉर्म्युला झाला होता.


भाजपच्या या हिट फॉर्म्युलाला डॅमेज करण्याचा प्रयत्न सध्या समाजवादी पार्टीकडून केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून सपानं कधी नव्हे ते मुस्लिम – यादव फॉर्म्युल्याशिवाय इतर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 


जाटांवर प्रभाव असलेल्या जयंत चौधरी यांच्याशी पक्षाने युती केली आहे. त्यासोबत ओबीसीमध्ये काही पॉकेट्समध्ये प्रभाव असलेल्या राजभर यांच्या पक्षासोबत सपाने युती केली आहे. त्याचसोबत भाजपच्या तीन बिगर यादव ओबीसी मंत्र्यांना पक्षात घेतलं आहे. राजीनामा देताना या तीनही ओबीसी मंत्र्यांनी एका सुरात नाराजी व्यक्त केली आहे. 


ओबीसी, दलित आणि अल्पसंख्याक यांना भापजपकडून न्याय मिळत नाही असा राग आळवला आहे. बिगर यादव समाजाला भाजपपासून दूर खेचण्यासाठी एक वातावरण निर्मिती म्हणून या स्ट्रॅटर्जीकडं पाहिलं जातं आहे.


भाजप डॅमेज कंट्रोल कसं करणार?


मुळात भाजपनं अनेक राजकीय सर्व्हे केलेले आहेत. त्यात अनेक नेते हे पराभूत होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्व्हेच्या आधारे अनेकांची तिकीटे कापली जाणार अशी चर्चा आहे. त्यामुळे काहींनी पक्ष सोडला अशीची चर्चा आहे. कांहीना मतदारसंघ बदलून हवे होते. 


काहींना त्यांच्या मुलांना आणि घरातील इतरांना तिकीटे हवी होती. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही प्रमाणात तोटा झाला तरी या घाऊक पक्षांतराचा फारसा तोटा भाजपला होणार नाही असा दावा भाजपकडून केला जातो आहे. नेते गेले तरी बिगर यादव ओबीसी मतदार भाजपपासून दूर जाणार नाही अशी भाजपला आशा आहे. उलट असे काही नेते पक्षातून बाहेर गेल्यामुळे अँटीइन्कंबन्सी कमी होईल असं भाजपला वाटतंय.