Rahul Dravid To Gautam Gambhir: भारत आणि श्रीलंका दरम्यान 3 मॅचची टी 20 सिरिजची पहिली मॅच आज खेळवली जाणार आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया मैदानात उतरेल.याआधी टीम इंडियाचा माजी कोच राहुल द्रविड याने नवा कोच गौतम गंभीरला खास सल्ला दिलाय. हा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केलाय. श्रीलंकेविरुद्ध 3 मॅचची टी 20 सिरिजच्या माध्यमातून गौतम गंभीर आपल्या कोचिंग करिअरची सुरुवात करतोय.याआधी राहुल द्रविडने त्याच्याशी संवाद साधलाय. त्याने गौतम गंभीरला टीम इंडियाचे कोचपद संभाळल्याबद्दल शुभेच्छा दिल्यायत. तसेच गंभीरकडून काही अपेक्षादेखील व्यक्त केल्या आहेत.कोणत्या खेळाडुंना टिममध्ये संधी द्यायला हवी? याबद्दलही त्याने भाष्य केले आहे. राहुल द्रविडने वॉइस मेसेजच्या माध्यमातून गंभीरला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर गंभीरने द्रविडचे आभार मानले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 वर्ल्ड कपसोबत राहुल द्रविडचा कोच म्हणून कार्यकाळ संपला. राहुल द्रविडच्या कोचिंगखाली टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळाला. आता त्याने आपली जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपावली आहे. गौतमला टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून निवडण्यात आलंय. याआधी तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटोर होता. त


काय म्हणाला द्रविड?



आपल्या दुनियेच्या सर्वात रोमांचकारी कामात तुमचं स्वागत आहे. टीम इंडियाचा हेड कोच म्हणून माझा कार्यकाळ संपल्यास 3 आठवडे झाले आहेत. टीम इंडियासोबत घालवलेले क्षण माझ्या स्वप्नापेक्षाही मोठे होते.बारबाडोस आणि त्यानंतर मुंबईत घालवलेले काही दिवस हे न विसरता येणारे क्षण आहेत.मी या टीमसोबत खूप छान आठवणी जोडल्या आहेत. टीम इंडियाचा कोच बनल्यानंतर मी तुझ्याकडूनही ही अपेक्षा करतो. टीम इंडियामध्ये पूर्णपणे फीट खेळाडू घेतले जातील, अशी आशा मी व्यक्त करतो.यासाठी तुम्हाला शुभेच्छा. 


पॅशन आणि डेडिकेशन


टीममेटच्या रुपात मी तुम्हाला मैदानात झोकून देत खेळ करताना पाहिलंय. अनेक आयपीएल सिझनमध्ये मी तुमच्यातली जिंकण्याची जिद्द पाहिली आहे. भारतीय क्रिकेटसाठी मी तुमची पॅशन आणि डेडिकेशन ओळखतो.हे सर्व गुण तुम्ही या कामात वापराल, हा मला विश्वास असल्याचे राहुल द्रविडने म्हटलंय. तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत, हे तुम्ही जाणून आहातच. 


..तेव्हा दीर्घ श्वास घेऊन छानशी स्माईल दे


तुम्ही तुमच्या वाईट काळातदेखील एकटे नसाल. तुम्हाला खेळाडू, सपोर्ट स्टाफ, माजी लीडर्स, मॅनेजमेंटची सोबत मिळेल. आपण कोणासाठी खेळतोय, हे कधी विसरु नका.फॅन्ससाठी जे नेहमी डिमांडींग असतात पण नेहमी टीमसोबत उभे राहतात. कठीण काळात एक दीर्घ श्वास घेऊन एक पाऊल मागे घ्याव. अडचणीत असाल तर छानशी स्माईल द्यावी. यानंतर पुढे जे काही होईल ते हैराण करणारं असेल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. टीम इंडियाला तुम्ही नव्या उंचीवर घेऊन जाल, हा मला विश्वास आहे. टीम इंडियाचा कोच दुसऱ्या कोचला हे शेवटचे शब्द सांगतोय, असे त्याने पुढे म्हटले.