चेन्नई : भारताने ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव करून पहिल्या एकदिवसीय सामन्यात बाजी मारली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या हारण्याचे कारण सांगितले आहे. खर तर हा सामना आपल्या हातात होता, परंतु महेंद्रसिंग धोनी व हार्दिक पांड्याच्या भागीदारीने डाव पलटला असे तो म्हणाला. 


स्मिथ म्हणाला, "आम्ही नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली होती, पण धोनी आणि पंड्या यांच्या भागीदारीने गेम बदलवून टाकला.  त्यामुळे आम्ही जी चांगली सुरूवात केली होती त्यात सातत्य टिकवू शकलो नाही.स्मिथ म्हणाला की, मधल्या सत्रात आम्ही अनेक विकेट्स गमावल्या आणि हवामानामुळे आम्ही परिणामांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही,याची आम्ही तक्रार करीत नाही. पण रविवारचा सामना आपल्यासाठी चांगला नव्हता.
स्मिथने भारतीय संघातील गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. गोलंदाजांनी नव्या चेंडूवर चांगली कामगिरी केली. नवीन चेंडू चांगली स्विंग होत असल्याचे तो म्हणाला. उभय देशातील दुसरा एकदिवसीय सामना कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर गुरुवारी होणार आहे.