Hugh Jackman Favorite Indian Cricketer Is Rohit Sharma : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय क्रिकेट टीमची स्तुती केली आहे. त्यासोबत त्यानं हे देखील सांगितलं की त्याचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण आहे. 'डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन' मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले. जाणून घेऊया कोण आहे तो क्रिकेटर ज्याने हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमनचे मन जिंकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह्यू जॅकमन हा गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'डेडपूल अॅन्ड व्हॉल्व्हरिन' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. एका मुलाखती दरम्यान, हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमननं रोहित शर्माची स्तुती केली. ह्यू जॅकमननं त्याचं क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि रोहित शर्माच्या प्रतिभेचं कौतुक केलं. खरंतर, जेव्हा ह्यू जॅकमनला प्रश्न विचारण्यात आला की टीम इंडियामध्ये त्याचा सगळ्यात आवडता खेळाडू कोणता आहे? तर त्यानं काहीही विचार न करता लगेच आताचा? रोहित. त्यानं इतक्या पटकन दिलेल्या उत्तरानं त्याचा सोबत असलेला सह-कलाकार आणि मित्र रयान रेनॉल्ड्सला देखील आश्चर्य झाले. तर त्यांची मुलाखत घेणाऱ्यांनी म्हटलं की आम्ही कप जिंकलो... तर ह्यूनं परत म्हटलं, 'भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानं मला आनंद झाला. त्यानं काय खेळी केली होती, त्याला शब्द नाही असं त्याचं म्हणणं होतं.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ह्यू जॅकमनच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला,'मुंबईचा राजा'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'कोण  बोलतं की मुंबई थांबते थांबवणारा पाहिजे.' तिसरा नेटकरी ह्यू जॅकमनला म्हणाला, 'तू रोहित शर्माला निवडून योग्य काम केलं आहेस.'


हेही वाचा 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स!


ह्यू जॅकमन हा 'डेडपूल अॅन्ड व्हॉल्व्हरिन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो रयान रेनॉल्ड्स,  एम्मा कोरिन, मॅथ्यू मॅकफेडेन आणि इतर कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ह्यु जॅकमननं अनेकदा व्हॉल्व्हरिन ही भूमिका साकारली आहे. त्यानं तब्बल 9 वेळा ही भूमिका साकारली आहे. केविन फीज निर्मित 'डेडपूल अॅन्ड व्हॉल्व्हरिन' हा चित्रपट 26 जुलै रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होईल.