Marathi Actress Who Wrote Dialogues Kalki 2898 AD : 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली भव्यता ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटातील सगळेच कलाकार हे चर्चेत आले असले तरी देखील सगळ्यात जास्त चर्चा ही खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता कमल हासन यांची सुरु आहे. तुम्हाला माहितीये का की कमल हासन यांचे या चित्रपटाच्या हिंदीतील सगळे संवाद हे एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य झालं असेल पण हो हे खरं असून अभिनेत्री नेहा शितोळेनं हे संवाद लिहिले आहे. याविषयी स्वत: नेहानं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
नेहानं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केली आहे. यात नेहानं तिचा एक फोटो शेअर केला आहेत. या फोटोत ती 'कल्कि 2898 एडी' मध्ये जी स्पेशल गाडी दाखवण्यात आली आहे, ती तिच्या समोर उभी आहे. तर त्यात नेहानं सांगितलं की 'कल्कि 2898 एडीची हिंदी व्हर्जन हे माझ्या काही शब्दांनी संपते. जेव्हा तुम्ही लिहिलेले शब्द कमल हासन सरांच्या आवाजात ऐकता तेव्हा ही भावना खूप विलक्षण असते. या भव्यदिव्य चित्रपटाचा छोटासा भाग होणं ही माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे.'
नेहानं कोणत्याही दाक्षिणात्य चित्रपटासाठी डायलॉग्स लिहिण्याची ही पहिली वेळ नाही. तर या आधी देखील तिनं लोकप्रिय ठरलेला 'सीता रामम' या दाक्षिणात्य चित्रपटासाठी डायलॉग्स लिहिले आहेत. त्यावेळी तर तब्बल 5 दिवसात नेहानं या चित्रपटासाठी हिंदी डायलॉग्स लिहिले. तर असं नक्कीच म्हणता येईल की नेहा ही फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत डायलॉग राईटर देखील आहे.
हेही वाचा : अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना जस्टिन बीबरनं मिठी मारलेली 'ती' कोण?
'कल्कि 2898 एडी' विषयी बोलायचे झाले तर सैकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं 9 व्या दिवशी 17.25 कोटींची कमाई केली. यात तेलगु चित्रपटानं 6 कोटी, हिंदी चित्रपटानं 9.35 कोटी, कन्नड चित्रपटानं 0.2 कोटी, मल्याळम चित्रपटानं 0.7 कोटींचं कलेक्शन केलं. यासोबत 'कल्कि 2898 एडी' नं 9 दिवसात एकूण 432.1 कोटींची कमाई केली. ज्यात 9 दिवसात तेलगुमध्ये 218.25 कोटींची कमाई, तमिळमध्ये 24.1 कोटी, हिंदीमध्ये 171.85 कोटी, कन्नडमध्ये 3 कोटी आणि मल्याळममध्ये 14.9 कोटींची कमाई केली आहे.