Sania Mirza चा पती Shoaib Malik चा अपघात, कारच्या उडाल्या चिंधड्या
या अपघातात कारच्या पूर्णपणे चिंधड्या उडाल्या
लाहौर : पाकिस्तानचा स्टार क्रिकेट शोएब मलिकला (Shoaib Malik) कार अपघात झालाय. त्याची कार रस्त्याशेजारी असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये कारच्या पूर्णपणे चिंधड्या उडाल्या. या अपघातात शोएब मलिक सुरक्षित आहे.
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) चा पती शोएब मलिक (Shoaib Malik)आपल्या स्पोर्ट्स कारमधून पाकिस्तान सुपर लीगच्या प्लेअरच्या घरी ठरवलेल्या कार्यक्रमासाठी चालला होता. लाहौर नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरजवळ कार खूप वेगात असताना तिचे संतुलन ढासळले. कार कंट्रोलच्या बाहेर गेली आणि रस्त्याशेजारी असलेल्या उभ्या असलेल्या ट्रकचा जाऊन ठोकली.
शोएब मलिकच्या स्पोर्ट्स कारचा चक्काचूर झालाय. पण सुदैवाने तो यातून सुखरुप बाहेर पडलाय. अपघातानंतर शोएब मलिकने कोणती प्रतिक्रिया दिली नाही.