आयपीएल २०२० : विराट कोहलीने सांगितलं हरण्यामागचं खरं कारण
सामना हरल्यानंतर कॅप्टन कोहलीची प्रतिक्रिया
शारजाह : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध ५ विकेटने पराभव पत्करल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीने यामागचे कारण सांगितले. आहे. मॅचमधील स्थिती अचानक बदलले ज्याची टीमला अपेक्षा नव्हती. बंगळूरचे फलंदाज या मॅचमध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले. टीम २० ओव्हरम्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १२० रन्स बनवू शकली. हैदराबादने सहज हा स्कोर पूर्ण केला आणि ५ विकेट्सच्या बदल्यात विजय संपादन केला.
आम्हाला वाटले १४० पर्यंत स्कोअर जाईल. पण स्थिती अचानक बदलली. ज्याची आम्ही कल्पना केली नव्हती. वातावरण चांगले असेल आणि मैदानात दव नसेल असे आम्हाला वाटले होते असे कोहली म्हणाला.
आम्ही बॅटीने हिम्मत नाही दाखवू शकलो. त्यांच्या बॉलर्सनी खूप चांगली बॉलिंग केली आणि पिचचा चांगला वापर केल्याचे त्याने सांगितले.
प्लेऑफ बद्दल देखील त्याने भाष्य केले. शेवटची मॅच जिंका आणि टॉप २ मध्ये राहून लीग स्टेज संपवून टाका असे समोर होतो. हे खूप रोमांचक होत चाललंय. २ टीम १४ पॉईंट्सवर आहेत असेही तो म्हणाला.
आयपीएल २०२० च्या ५२ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह सनरायझर्स अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे.
हैदराबाद संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीचा शानदार खेळ दाखवून खेळ जिंकला. बंगळुरूच्या १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्सने १४.१ ओव्हरमध्ये १२१-५ धावा करून लक्ष्य गाठले. हैदराबादकडून ऋद्धिमान साहाने सर्वाधिक ३९ धावा केल्या.
या स्पर्धेत आव्हाण कायम राखण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकायचाच होता. सनरायझर्सने आरसीबीचा ५ गडी राखून पराभव केला.
सनरायझर्सचा अनुभवी खेळाडू केन विल्यमसन ८ धावांवर आऊट झाला. या सामन्यात हैदराबादच्या ऋद्धिमान साहाने शानदार ३९ रन केले. मनीष पांडेने २६ धावा केल्या. पहिली विकेट लवकर गमवल्यानंतर हैदराबाद संघाने पॉवरप्लेमध्ये ५८-१ अशी धावसंख्या उभारली.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर केवळ ८ धावांवर वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर आऊट झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमवत १२० धावा केल्या.
वॉशिंग्टन सुंदरने आरसीबीसाठी २१ धावांची मौल्यवान खेळी केली. ३२ धावांची खेळी साकारल्यानंतर बंगळुरूच्या जोस फिलिपला रशीद खानने आऊट केले. जीवदान मिळाल्यानंतर ही एबी डिव्हिलियर्स २४ धावांवर शहबाज नदीमच्या बॉलवर आऊट झाला.
या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली देखील काही खास करु शकला नाही.७ धावांवर तो संदीप शर्माच्या बॉलवर आऊट झाला.