तळहात आणि तळपायाला केस का नसतात? संशोधनातून सत्य समोर

आपल्या शरीरावर अगदी सगळीकडे केस असतात. अगदी नाकात आणि कानातही केस असतात. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, की तळहात आणि तळपायाला केस का नसतात?

| Nov 26, 2024, 16:46 PM IST
1/7

आपल्या शरीरावर असलेले केस हे आपल्या त्वचेचे संरक्षण करते. या शरीरातील काही भागांवर आपल्याला केस दिसत नाहीत. संपूर्ण शरीरावर केस असतात. पण तळपाय आणि तळहाताचा संरक्षणासाठी केस का नसतात?

2/7

या प्रश्नाचं उत्तर संशोधकांनी शोधलंय. 2018 मध्ये संशोधनातून युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या डर्मेटोलॉजिस्ट सारा मिलर यांनी एका मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 

3/7

शरीरात WNT नावाचं प्रोटीन असतं जे आण्विक संदेशवाहक म्हणून आपल्या शरीरात काम पाहते. यामुळे केसांची वाढ, जागा आणि पेशींमधील वाढ कार्यरथ असतात. 

4/7

संशोधनातून असं समोर आलंय की, केसांच्या वाढीसाठी या प्रथिनेद्वारे प्रसारित होणारे सिग्नल हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. 

5/7

शरीराच्या ज्या भागात केस वाढत नाहीत त्या भागात नैसर्गिकरित्या शरीरात अवरोधक असतात. जे या प्रोटीनला त्याचं काम करण्यापासून रोखतात. 

6/7

वैज्ञानिकानुसार अवरोधक हे देखील आपल्या शरीरातील एक प्रथिने आहेत. ज्याला Dickkopf 2 याला वैद्यकिय भाषेत DKK2 असं म्हटलं जातं. 

7/7

हे DKK2 आपल्या तळहात आणि तळपायावर असतात. ज्यामुळे या भागात केस वाढत नाहीत. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)