मुंबई : जगातील विस्फोटक बॅट्समन्समध्ये गणला जाणारा विराट कोहली मैदानात आणि मैदानाबाहेर नेहमी सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतो. आयपीएलमध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स नेहमी उजळताना दिसलाय. त्याने सिझन १३ त आतापर्यंत ७ मॅचमध्ये २५६ रन्स बनवलेयतय. आरसीबीकडून सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या बॅट्समन्समध्ये देखील तो नंबर वन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहली हा आपल्या बॅटींग स्टाईलसोबत फॅशन आयकॉन म्हणून देखील जगभरात ओळखला जातो. मॅच सुरु असताना तसेच प्रॅक्टीस सेशन्समधील त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रॅक्टीस सेशनमध्ये तो अधिक घाम गाळताना दिसतो. सर्वाधिक उत्तम फिटनेस असणाऱ्या खेळाडूंमध्ये तो गणला जातो. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये कोहली क्रिकेट किटमधील वस्तू दाखवताना दिसतोय.



काय आहे कोहलीच्या बॅगेत ?



हेल्मेट
स्लीव्स 
हेल्मेट कव्हर
२ बॅट
लेग पॅड 
आरसीबीची टोपी 
लेग गार्ड
ग्रिप पोल
बॅटवरील स्टिकर्स
लाल रंगाच्या पॅडची जोड
छोटे गल्व्स
स्वेट बॅंड
ग्रिपटेक क्रीम
गल्व्सचे १० जोड
स्पेशल शूज २ जोडी
रिस्ट बॅंड


कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलॉरच्या टीमने ७ मॅचपैकी ५ मध्ये विजय मिळवलाय. आरसीबी १० पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडीयन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स हे देखील १०-१० पॉईंट्ससह वरच्या स्थानावर आहेत. पण आरसबीपेक्षा त्यांचा रनरेट असल्याने ते गुणतालिकेत वरच्या स्थानावर आहेत.