PHOTOS : लॉस एंजेलिसमध्ये आगडोंब; नोरा फतेही कशीबशी वाचली, हॉलिवूडकरांची घरं आगीच्या भक्ष्यस्थानी

LA california wildfires : अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथं जंगलामध्ये लागलेल्या आगीमुळं एक नवं संकट ओढावलं आहे. 

Jan 10, 2025, 08:56 AM IST

LA california wildfires : अतिशय भीषण आणि प्रचंड प्रमाणात लागलेल्या या आगीचं कारण काय? घटनास्थळाची दृश्य पाहून मन विषण्ण होईल. 

1/7

वणवा

LA california wildfires hollywood celebs home destroyed nora fatehi rescued

जवळपास दोन ते तीन दिवसांपासून अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये धुमसणारा वणवा अद्याप शांत झाला नसून, मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या या आगीच्या झळांनी सर्वकाही बेचिराख केलं आहे. नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार अद्यापही पाच भागांमध्ये वणवा धुमसत असून, यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या हॉलिवूड हिल्सचंही नुकसान झालं आहे. (छाया सौजन्य- रॉयटर्स)

2/7

आगडोंब

LA california wildfires hollywood celebs home destroyed nora fatehi rescued

अमेरिकेतील हा आगडोंब वाढत असतानाच आतापर्यंत प्रशासनानं इथून जवळपास 130000 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं आहे. दरम्यान, ही येथील भागामध्ये लागलेली सर्वात मोठी आग असल्याची माहितीसुद्धा आता समोर येत आहे. (छाया सौजन्य- रॉयटर्स)  

3/7

वाऱ्याचा प्रचंड वेग

LA california wildfires hollywood celebs home destroyed nora fatehi rescued

वातावरणातील बाष्पाचा अभाव आणि वाऱ्याचा प्रचंड वेग यामुळं ही आग अद्यापही विझवता आली नसून, यामध्ये अनेकांची घरंदारं जळून खाक झाली आहे. हॉलिवूड सेलिब्रिटींच्याही घरांचा यात समावेश असून, त्यांनीही या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. या सेलिब्रिटींमध्ये पॅरिस हिल्टन, बिली क्रिस्टल, अॅडम ब्रॉडी उन यांचाही समावेश आहे. (छाया सौजन्य- रॉयटर्स)  

4/7

संकट

LA california wildfires hollywood celebs home destroyed nora fatehi rescued

सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना नोरा फतेहीसुद्धा या संकटातून कशीबशी बचावली. खुद्द नोरानंच सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. (छाया सौजन्य- रॉयटर्स)

5/7

घटनास्थळ

LA california wildfires hollywood celebs home destroyed nora fatehi rescued

सध्या नोरा लॉस एंजेलिसमध्ये असून, ती जिथं थांबली होती तिथून हे घटनास्थळ नजीक असल्यानं तिलाही घर रिकामं करण्याची नोटीस मिळाली. नोटीस मिळताच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तिनं तिथून निघण्याचा निर्णय घेतला. (छाया सौजन्य- रॉयटर्स)  

6/7

आगीच्या भक्ष्यस्थानी

LA california wildfires hollywood celebs home destroyed nora fatehi rescued

कॅलिफोर्नियामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यानं पॅलिसेड्स भागाचं मोठं निकसान झालं असून, त्यामागोमाग ईटन इथंही परिस्थितीनं वाईट रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- रॉयटर्स)

7/7

भीती

LA california wildfires hollywood celebs home destroyed nora fatehi rescued

आतापर्यंत या भागामध्ये 2000 इमारती आणि घरं नष्ट झाली असून ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती प्रशासनानं व्यक्त केली आहे. दरम्यान, राष्ट्राध्य जो बायडेन यांनीही बचावकार्यामध्ये जातीनं लक्ष घालत इटली दौराही रद्द केला आहे. (छाया सौजन्य- रॉयटर्स)