IPL 2020: CSK च्या अपयशातही धोनीच्या नावे `हा` रेकॉर्ड
धोनीच्या नावे होतायत रेकॉर्ड
अबू धाबी : आयपीएल १३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कॅप्टन्सीमध्ये कमाल दाखवताना दिसत नाहीय. त्याची बॅट देखील चालताना दिसत नाही. यामुळे गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्स विरोधात मैदानात उतरलेल्या महेंद्रसिंग धोनी टी २० मॅचमध्ये एक रेकॉर्ड केलाय. असं असलं तरी सीएसकेला या मॅचमध्ये रॉयल्स विरोधात हार पत्करावी लागली.
२०० आयपीएल मॅच खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आयपीएल २०२० मध्ये ३७ वी मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये खेळला गेला. धोनीच्या करियरमधला हा २०० वा सामना होता. २०० मॅच खेळणारा धोनी पहीला खेळाडू बनलाय.
धोनीनंतर मुंबई इंडीयन्सचा कॅप्टन रोहित शर्माने सर्वाधिक १९७ मॅच खेळल्या आहेत. २०० आयपीएल मॅच दरम्यान माहीने आयपीएल फ्रेंचाइजी सीएसके आणि पुणे सुपर जाइंट्समध्ये खेळताना दिसला. धोनीने आपल्या ऐतिहासिक करियरमधील सामना चेन्नई सुपर किंग्जमधून खेळत ४ हजार रन्सचा आकडा पूर्ण केला.
१३ वर्षात अनेक रेकॉर्ड
आयपीएल २००८ पासून सध्याच्या मॅचपर्यंत धोनी या लीगचा भाग बनलाय. या १३ वर्षांच्या प्रवासात टीम इंडीयाचा माजी कॅप्टन धोनीने अनेक इतिहास रचलेयत. धोनीने चेन्नई सुपर किंग्जला ३ वेळा चॅम्पियन आणि ८ वेळा फायनलपर्यंत पोहोचवले.
विकेटकिपर म्हणून १५० विकेट्स घेत धोनी आयपीएलमधील यशस्वी किपर बनलाय. आपल्या कॅप्टन्सीमध्ये त्याने १०४ मॅच जिंकत नवा रेकॉर्ड केलाय. तो २१५ सिक्सर मारणार भारतीय खेळाडू ठरलाय. तसेच २०० मॅचमध्ये त्याने ४ हजार ५९६ रन्स केले.