दमदार इंजिन आणि उत्तम मायलेज, लवकरच लॉन्च होणार महिंद्राची नवीन बोलेरो कार, किंमत फक्त...

लवकरच महिंद्रा कंपनीची नवीन बोलेरो कार लॉन्च होणार आहे. सात जणांच्या कुटुंबासाठी कमी किंमतीमधील ही कार खूपच फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या सविस्तर

| Jan 10, 2025, 18:00 PM IST
1/7

महिंद्रा कंपनी

महिंद्रा कंपनीची बोलेरो कार ही सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. या कारवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. 

2/7

बोलेरो कार

अशातच आता महिंद्रा नवीन बोलेरो कार लॉन्च करणार आहे. जिच्या दमदार लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या नवीन मॉडेलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. 

3/7

आरामदायी प्रवास

1493 CC च्या दमदार इंजिनसह या नवीन मॉडेलवर अनेक सुविधा ग्राहकांना देण्यात आल्या आहे. या कारमध्ये 7 लोक आरामदायी प्रवास करु शकतात.   

4/7

डिझाइन

नवीन बोलेरो कारमध्ये अनेक डिझाइन देखील उपलब्ध आहेत. पाच मॅन्युअल गिअरसह सुरक्षेसाठी एअरबॅग देखील दिल्या आहेत. 

5/7

किंमत

कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन बोलेरो कारची भारतीय बाजारात 9.78 लाख रुपये तर टॉप मॉडेलची किंमत 10.69 लाख रुपये आहे. 

6/7

खास सुविधा

महिंद्रा कंपनी त्यांच्या नवीन बोलेरो कार घेणाऱ्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देत आहे. ज्यामध्ये बजेट कमी असणाऱ्या ग्राहकांसाठी ईएमआयची सुविधा देखील दिली आहे. 

7/7

ईएमआय

ज्यामध्ये तुम्ही नवीन बोलेरो कार 25599 रुपये महिना ईएमआय भरून खरेदी करू शकता. लवकरच ही नवीन बोलेरो कार लॉन्च होणार आहे.