नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघे २३ नोव्हेंबर म्हणजे आज विवाहबद्ध झाले. या दोघांनी ही कोर्ट मॅरेजला पसंती दिली. मात्र २७ नोव्हेंबरला मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये लग्नाचे खास रिसेप्शन असेल. रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेटच्या जगतातील अनेक लोक सहभागी होतील. लग्नात सागरीकाने लाल रंगाची साडी नेसली होती. तर झहीरने सॉफ्ट पिंक शेडचा कुर्ता परिधान केला होता. 


लग्नाचे फोटो शेअर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर सागरिका आणि झहीरची मैत्रीण अंजना शर्माने लग्नाचे फोटो शेअर केले. लग्नाला जाहीरचा जवळचा मित्र आणि क्रिकेटर आशिष नेहरा देखील उपस्थित होता. 
अधिक धुमधडाका न करता झहीर आणि सागरीकाने कोर्ट मॅरेज करण्यास पसंती दिली. या लग्नाला झहीर-सागरीकाच्या परिवाराबरोबर झहीरचे जवळचे मित्र आणि क्रिकेटर युवराज सिंग, आशिष नेहरा आणि अजित आगरकर हे उपस्थित होते. संध्याकाळी ५ स्टार हॉटेलमध्ये कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी मेंदी समारंभ होईल आणि सोमवारी शानदार रिसेप्शन असेल. 



सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघ दीड वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांनी त्यांचे प्रेमप्रकरण इतकी वर्ष गुलदस्तातच ठेवले होते. 



सागरीकाची को स्टार असलेल्या विद्या एम मालवाडे हिने सागरिका एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यात सागरीकाने खूप दागिने घातलेले दिसत आहेत. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, "आणि पागलपणा सुरु झाला.. काल!!! #bridetobe# माझ्या बहिणीला खूप आशीर्वाद."