अमिताभ बच्चनवर भारी पडलेला 'हा' अभिनेता आज एका ब्रेकसाठी करतोय स्ट्रगल!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आज इतकी लोकप्रियता मिळवली आहे की त्यांना कोणी मागे टाकू शकत नाही. मात्र, एक काळ असा होता की एका अभिनेत्यानं त्यांना देखील मागे टाकले होते. पण आज तोच अभिनेता एका ब्रेकसाठी स्ट्रगल करत आहे. तुम्हाला प्रश्न पडला की हा अभिनेता कोण आहे? तर चला त्याच्याविषयी जाणून घेऊया...

| Dec 21, 2024, 15:03 PM IST
1/7

अमिताभ बच्चनसोबत काम करणारा हा अभिनेता दुसरा कोणी नसून गोविंदा आहे. गोविंदाच्या करिअर विषयी टीनू वर्मानं 'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. त्यावेळी त्यानं 'बडे मियां-छोटे मियां’ या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. 

2/7

गोविंदाला ‘राजा बाबू’ ‘हीरो नंबर 1’ आणि 'बडे मियां-छोटे मियां’ या सारख्या चित्रपटांमधून लोकप्रियता मिळाली होती. पण त्याला काम न मिळण्यासाठी तोच जबाबदार असल्याचं त्यानं म्हटलं. 

3/7

गोविंदाला का काम मिळतं नाही याविषयी सांगत टीनू वर्मा म्हणाला, 'तो कधीच वेळेवर नसायचा. ती म्हणं आहे ना लोकं स्वत: त्या पायावर कुऱ्हाड मारतात पण गोविंदानं त्याची मान ही कुऱ्हाडीवर मारली आहे.'

4/7

त्याविषयी स्पष्ट बोलताना टीनू वर्मा ‘अचानक’ या चित्रपटाचा किस्सा सांगितला. "तो 'बडे मियां-छोटे मियां’ मध्ये अमिताभ यांच्यावर भारी पडत होता. एक उत्तम अभिनेता आणि प्रतिभावान सुद्धा आहे. पण त्यानं वेळेला कधीच महत्त्व दिलं नाही आणि आज वेळ त्याला महत्त्व देत नाही." 

5/7

पुढे टीनू वर्मा म्हणाला, 'त्याचा एक किस्सा आहे. चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोइराला आणि गोविंदा महत्त्वाच्या भूमिकेत होते. दोघांचा सीन शूट होणार होता. पण तो फक्त गोविंदामुळे झाला नाही. दिग्दर्शक हा गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीला कंटाळला होता. तरी सुद्धा गोविंदानं वेळ मागितली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी गोविंदाला 11 ची वेळ दिली. पण तो त्या दिवशी देखील वेळेवर आला नाही.'   

6/7

याविषयी आणखी सांगत टीनू वर्मा म्हणाला, 'दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमनं त्याची संध्याकाळी 4 वाजे पर्यंत प्रतीक्षा केली. मी थकलो आणि त्यानंतर मरीन ड्राइव्हवर खाण्या-पिण्यासाठी पोहोचलो. तिथे कॉलेजची गर्दी होती. ही गर्दी का आहे हे पाहण्यासाठी तो पुढे गेला तर तिथे गोविंदा हा परफॉर्म करत होता. त्यानंतर त्याची नजर टीनूवर पडली आणि तो तिथून पळाला.'

7/7

गोविंदानं स्वत: सगळं गमावलं हे सांगत टीनू पुढे म्हणाला, 'गोविंदा एक उत्तम अभिनेता आणि डान्सर आहे. एक काळ होता जेव्हा प्रेक्षक त्याला चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक असायचे आणि एक काळ असा आहे जेव्हा लोकांना त्याला काम द्यायचं नाही. कारण त्यानं कधीच वेळेला किंमत दिली नाही. त्यानं स्वत: त्याचं करिअर खराब केलं. तो एका दिवसात तीन शूट करण्याचं ठरवायचा आणि तीन पैकी एका शूटवर तो पोहोचायचाच नाही.'