फक्त रोहित शर्माच्या नावे हा रेकॉर्ड
श्रीलंकाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये शतक ठोकल्यानंतर चौथ्या वन डेतही रोहित शर्माने धमाकेदार खेळी करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चौथ्या वनडे सामन्यात त्याने ८५ बॉल्समध्ये शतक लगावले. त्याच्या वन डे करिअरमधील हे तेरावे शतक आहे.
नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये शतक ठोकल्यानंतर चौथ्या वन डेतही रोहित शर्माने धमाकेदार खेळी करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चौथ्या वनडे सामन्यात त्याने ८५ बॉल्समध्ये शतक लगावले. त्याच्या वन डे करिअरमधील हे तेरावे शतक आहे.
हे शतक ठोकल्यानंतर रोहितच्या नावे रेकॉर्ड नोंदविला गेला आहे. हा रेकॉर्ड विराट कोहली, सचिन तेंडुलकर अशा दिग्गज खेळाडूंच्या नावेही झाला नव्हता.
वनडे करिअरमधील वेगवान शतक
रोहित शर्माच्या वन डे करिअरमधील हे वेगवान शतक आहे. त्याने ८५ बॉल्समध्ये हे शतक लगावले. याआधी त्याने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ९८ बॉल्समध्ये शतक लगावले होते.
हा कारनामा करणारा पहिला भारतीय बॅट्समॅन
रोहित शर्माने याआधी तिसऱ्या वन डेमध्ये शतक ठोकले होते. त्याचे श्रीलंकेविरुद्धचे हे सलग दुसरे शतक आहे. श्रीलंकेत असा रेकॉर्ड करणारा तो पहिला तर जगामध्ये असा रेकॉर्ड करणारा चौथा बॅट्समॅन ठरला आहे. रोहितने सलग दोनदा शतक ठोकण्याची कामगिरी तीन वेळा केली आहे. यामध्ये फक्त तो विराटच्यामागे आहे. विराटने चारवेळा सलग दोन शतक लगावले आहेत
द्रविडला टाकले मागे
रोहितचे वन डे मधील हे १३ वे शतक आहे. राहूल द्रविडच्या १२ शतकांचा रेकॉर्ड त्याने तोडला आहे. वनडे शतक ठोकण्यात तो गॅरी कर्स्टन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या रांगेत २४ व्या स्थानी पोहोचला आहे.
सिक्सर मारण्यात १९ वा नंबर
रोहित शर्माच्या नावे वनडेमध्ये १३२ सिक्सर आहेत. यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉट्सनचा १३१ सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडला आहे. सिक्सर मारणाऱ्या जगाच्या क्रमवारीत तो १९ व्या स्थानी पोहोचला आहे.