Imam-ul-Haq Takes Amazing Catch: सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान (SL vs PAK) यांच्यात पहिली कसोटी खेळवली जात आहे. गाले येथे हा सामना खेळवला जातोय. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 6 गडी गमावून 242 रन्स धावफलकावर लावल्या आहेत. या सामन्यातील पहिल्याच दिवशीच्या शेवटच्या षटकात पाकिस्तान संघाचा सलामीवीर इमाम-उल-हकने अप्रतिम कॅच घेत सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेकडून चांगली फलंदाजी करणाऱ्या सदीरा समरविक्रमाला 36 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात आला. पहिल्या दिवसाची शेवटची ओव्हर टाकली जात होती. या षटकात आघा सलमान गोलंदाजी करत होता. या ओव्हरमधील चौथा चेंडू वेगाने बाऊन्स झाला. त्याला फलंदाजाने बचाव करण्य़ाचा प्रयत्न केला. त्यावेळी बॅटला कट लागला. शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या इमामने उजवीकडे हवेत झोका घेतला आणि एक अप्रतिम झेल घेतला. सध्या या कॅचचा व्हिडीओ तुफान ट्रेंडिंगमध्ये आहे.


पाहा Video



सामन्यात श्रीलंकेने 6 गडी गमावून 242 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून सलामीवीर निशान मदुशंकाने 4, कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 29 धावा केल्या. सुरुवातीच्या 3 विकेट पडल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डी सिल्वा यांनी डावाची धुरा सांभाळली. मॅथ्यूज 64 धावांवर बाद झाला, तर डी सिल्वा 94 धावांवर नाबाद राहिला. दुसरीकडे पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 3 बळी घेतले.


पाहा दोन्ही संघ


श्रीलंकेचा संघ - दिमुथ करुणारत्ने (C), निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दिनेश चंडिमल, सदीरा समरविक्रमा (WK), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, कसून रजिथा.


पाकिस्तानचा संघ - अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (C), सौद शकील, सर्फराज अहमद (WK), आगा सलमान, नौमान अली, अबरार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह.