केवळ संतोष देशमुख नाही तर... परळीतील राजकीय हत्यांचा रक्तरंजित इतिहास! दर काही वर्षांनी 'या' दिवशी होते हत्या

Political Murders List Will Shock You: परळीचा रक्तरंजित इतिहास हा अत्यंत धक्कादायक असून येथे झालेल्या सर्व हत्यांमध्ये एक विचित्र पॅटर्न दिसून येतो. यावरच टाकलेली ही नजर...

| Jan 09, 2025, 14:31 PM IST
1/10

paralicrimenews

परळीमधील रक्तरंजित इतिहास पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात इथं आतापर्यंत कोणाकोणाच्या राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्या आहेत.

2/10

paralicrimenews

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आल्याचं प्रकरणाला आज एका महिन्याचा कालावधी उलटला आहे. या हत्याकांडामधील एक आरोपी अजून फरार आहे.   

3/10

paralicrimenews

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. राजकीय हेतूने ही हत्या करण्यात आली का? खंडणी प्रकरण या साऱ्याची चौकशी सुरु आहे.

4/10

paralicrimenews

मात्र बीडमध्ये राजकीय हेतूने हत्या करण्यात आलेले संतोष देशमुख हे एकमेव व्यक्ती नाही. बीडचा इतिहास पाहिल्यास येथील राजकीय हत्यांमध्ये एक फारच विचित्र पॅटर्न दिसून येतो. त्यावरच नजर टाकूयात आणि कोणाकोणाला कसं संपवणण्यात आलं पाहूयात...

5/10

paralicrimenews

संगीत डिघोळे हा एक कार्यकर्ता होता. माजी आमदार टी. पी. मुंडे यांचा जवळचा नातलग होता. 2000 मध्ये परळीत किशोर फड मित्रमंडळाचे जोरदार प्रस्थ होते. डिघोळे आणि फड दोघेही चांगले मित्र. पण या मैत्रीत मिठाचा खडा टाकला गेला. कारण डिघोळे हा वरचढ झाला होता. फडने डिघोळेला संपवले.   

6/10

paralicrimenews

पुढे किशोर फडही डोईजड झाल्याने 2008 मध्ये काकासाहेब गर्जेला हाताशी धरून त्याला संपवण्यात आले.   

7/10

paralicrimenews

राजकीय वैरामुळे वसंत गितेंचाही खून करण्यात आला तो बीडमध्येच!

8/10

paralicrimenews

बापू आंधळे यांचीही राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली.

9/10

paralicrimenews

गर्जेलाही नंतर अशाच पद्धतीने संपवण्यात आलं. हे सगळे खून सात वर्षांच्या अंतराने आणि घटस्थापनेच्या दिवशीच झाले आहेत. 

10/10

paralicrimenews

काकासाहेब गर्जेचाही 2015 च्या आसपास खून झाला. तेव्हापासून बीडमध्ये वाल्मिक कराडचे प्रस्थ आहे, असं सांगितलं जातं.