मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरील सायना सिनेमा आजच रिलीज झालेला असताना लवकरच आणखी एका खेळाडूवरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) लवकरच महिला क्रिकेटपटू मिथाली राज (Mithali Raj) हीच्या भूमिकेत झळकणार आहे. शाब्बाश मिठू (Shabaash Mithu) या चित्रपटात मिथाली राजचा जीवनप्रवास दाखवला जाणार आहे. या चित्रपटासाठी कशाप्रकारे तयारी सुरू आहे? मिथालीच्या भूमिकेत तापसी कशी दिसतेय, हे फॅन्सना दाखवण्यासाठी तापसीनेच तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.



याआधी सुद्धा तापसीने खेळाडूंच्या भूमिका केलेल्या आहेत. सूरमा सिनेमात ती एक हॉकी प्लेयर दाखवण्यात आली आहे. मात्र आता ती क्रीकेटर म्हणून दाखवण्यात येणार असल्याने त्या अनुषंगानेही तिची जोरदार तयारी सुरू आहे. 


नुशीन अल खदीर यांच्यासोबत तापसीचं प्रशिक्षण सुरू आहे. नुशीन ही मिथाली राजची चांगली मैत्रिण असून तीदेखील आधी क्रीकेट खेळत होती. त्यामुळे मिथालीच्या खेळण्याच्या भूमिकेसोबतच तिच्या वैयक्तिक जिवनातील गोष्टी समजून आणि तशाप्रकारे अभिनय करायला तापसीलाही सोपे पडत आहे.



 



कोण आहे मिथाली राज? 


मिथाली राज ही जगातील सर्वोत्तम बॅट्सवूमनपैकी एक आहे. ती एकमेव अशी महिले क्रिकेटर आहे जिने ODI मध्ये ६ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाचं २ विश्वचषकात नेतृत्व करणारीही ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. २० वर्षे तिने क्रीकेट खेळले आहे.