काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानात पूर्णपणे ताबा मिळवला आहे. यानंतर आता या तालिबान्यांनी गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्य कार्यालयात घुसखोरी आहे. हे तालिबानी आतंकवादी एके 47 सह या ऑफीसमध्ये घुसले. यांच्यासह माजी फिरकीपटू अब्दुल्लाह मजारीही (Abdullah Mazari) दिसत आहे. मजारीने अफगाणिस्तानचे 2 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. यासह मजारीने 21 फर्स्ट क्लास, 16 लिस्ट ए आणि 13 टी 20 सामने खेळला आहे. मजारीने काबूल इगल्सचंही प्रतिनिधित्व केलं आहे. काबूल इगल्स  शपागीजा टी 20 स्पर्धेतील टीम आहे. मजारी राशिद खानसह खेळला आहे. (Talibani entered Afghanistan Cricket Board's office with Rashid Khan's fellow player Abdullah Mazari) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट टीमचं भवितव्य अंधारात


तालिबान्यांनी ताबा मिळवल्याने अफगाणिस्तान क्रिकेटचं भवितव्य अंधारात आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीमने कठोर परिश्रम करुन  क्रीडा विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. राशिद खान, मुजीब उर रहमान यासारखे अफगाणि फिरकीपटू आपल्या गोलंदाजीवर फलंदाजांना नाचवतात. तसेच हझरततुल्ला झझाईने आपल्या बॅटिंगच्या जोरावर दबदबा निर्माण केला. मात्र तालिबान्यांच्या शिरकावानंतर आता क्रिकेट टीमचं भविष्य अंधारात दिसतंय.


क्रिकेट टीमला कोणताही धोका नाही....


तालिबानपासून अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोणताही धोका नाही, असा दावा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ हामिद शेनवारी यांनी केला आहे. तालिबानला क्रिकेट आवडतं. अफगाणिस्तान टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत 2021 मध्ये सहभागी होतील. तसेच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान शपागीजा क्रिकेट लीगचं आयोजन करणार असल्याचा दावाही करत आहे.