Ishan Kishan : आजकाल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. असाच एका खेळाडूने आपली नाराजी सोशल मीडियावर (Social Media) व्यक्त केली. ''क्रिकेटमधील माझं स्थान हे कोणाची देणगी किंवा प्रेरणा नाही.'', असं म्हणतं त्याने आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला. 


''क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी क्रिकेटशिवाय इतर कशाचाही विचार करत नाही. तसंच देशासाठी खेळणे हे माझं लहानपणापासूनचे स्वप्न होतं.''  


यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयने आशिया कप 2022 साठी (Asia Cup 2022) टीमची घोषणा केली आणि ईशानला धक्का बसला. (trending news ishan kishan posted sad story after not getting selected for asia cup in marathi)


तो पुढे म्हणाला की, '' क्रिकेटच्या महान खेळाडूकडून मी नेहमी काही ना काही शिकत आलो आहे.'' पण हे सांगताना त्याने कोणाही खेळाडूचं नाव घेतलं नाही. पण आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवणे हे माझ्या अखत्यारीत नाही, पण माझ्या खेळात काही कमरता असेल, असंही तो म्हणाला. 


ईशानचा आलेख घसरला


यंदाचा आयपीएलमध्ये ईशानचा आलेख घसरल्यामुळे त्याने या स्पर्धेत अपेक्षित अशी कामगिरी केली नाही. त्याचा परिणाम आशिया कपसाठीच्या संघात त्याची निवड झाली नाही. शिवाय आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची निवड होणे कठिण असल्याचं खेळ विशेषक म्हणत आहेत. 



भारत-पाकिस्तान आशिया कप 


28 ऑगस्टपासून आशिया कप सुरु होणार असून भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. UAEमध्ये 11 सप्टेंबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.