नवी दिल्ली : शुक्रवारी अबु धाबीमध्ये शेख जायेद स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलंने १००० सिक्सर्सचा रेकॉर्ड बनवला. आपल्याला मिळालेल्या २ जीवनदानाचा फायदा उचलत ६३ बॉलमध्ये ८ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने ९९ रन्सची विस्फोटक खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेलंलला सिक्सरचा रेकॉर्ड बनवण्याचा आनंद तर झालाच पण शतकापासून अवघ्या १ रन्सने दूर राहील्याच्या रागाने त्याचा चेहरा लाल झाला. 'युनिवर्स बॉस'सला जोफ्रा आर्चरने १९ व्या ओव्हरला क्लीन बोल्ड केले. यानंतर गेलंचं स्वत:वरच नियंत्रण सुटलं आणि त्याने बॅट मैदानात फेकली. यानंतर तात्काळ त्याने जोफ्राशी हात मिळवला, ज्याने त्याला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा दिल्या. 



ही एक चांगली इनिंग होती. मला वाटलेलं चांगला स्कोअर आहे, चांगली विकेट आहे. दुसऱ्या इनिंगला हे आणखी चांगल होईल. पण माझे ९९ वर आऊट होणं हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे गेल म्हणाला. 



टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ करुन देखील गेलने एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाहीय. मला आयपीएल ट्रॉफी जिंकायला आवडेल. पण आता ध्येय दूर आहे. तरुणांसोबत बॅटींग करणं मजेशीर असतं. मला माझ्या रेकॉर्डबद्दल माहीत नाही. मी आताही चांगले हीट करतो. कित्येक वर्षांच्या मेहनतीचे फळ आता समोर आल्याचेही तो म्हणाला.