हिवाळ्यात त्वचेला खूप खाज येतेय का? 'हा' उपाय करा मिळेल आराम

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. हिवाळ्यात योग्य काळजी न घेतल्यास त्वचा ड्राय आणि निरस होऊन जाते, तसेच बऱ्याचदा त्वचेला खाज उठणे रॅशेज येणे अशा समस्या देखील जाणवतात. तेव्हा हिवाळ्यात त्वचेला खाज येण्याची कारण कोणती आणि त्यावरचे उपाय जाणून घेउयात.   

| Dec 31, 2024, 17:19 PM IST
1/7

हिवाळ्यात त्वचेला खाज का येते?

त्वचा कोरडी होणे, थंड हवा आणि जास्त गरम पाण्याचा त्वचेशी आलेला संपर्क ही हिवाळ्यात त्वचेला खाज येण्यामागची मुख्य कारण असतात. तसेच एकच कपडे  अनेक दिवस घालणे यामुळे देखील त्वचेला खाज येण्याची समस्या होऊ शकते. 

2/7

मॉइस्चराइजर लावा :

हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून त्वचेवर नियमित मॅाइस्चराइजर लावावे. यामुळे त्वचा कोरडी होणार नाही तसेच खाज उठते. मॅाइस्चराइजर उपलब्ध नसेल तर तुम्ही थंडीच्या दिवसात शरीरावर तिळाचं तेल देखील लावू शकता. 

3/7

जास्त गरम पाण्याचा वापर करू नये :

आंघोळ करण्यासाठी हिवाळ्यात अनेकजण गरम पाणी वापरतात. परंतू थंडीच्या दिवसात आंघोळ करताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे त्वचा कोरडी होते आणि खाज उठते. तेव्हा आंघोळ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. 

4/7

थंड हवेपासून स्वतःचे संरक्षण करा :

हिवाळ्यात थंड हवेमध्ये बाहेर जात असताना गरम कपडे घालून त्वचेचे संरक्षण करा. यामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही आणि तुम्ही आजारी देखील पडणार नाही. तसेच खाजेपासून देखील संरक्षण होईल. 

5/7

निरोगी आहार घ्यावा :

निरोगी राहायचं असल्यास सकस आहार घेणं महत्वाचं ठरतं. तेव्हा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही ताजी फळ आणि भाज्यांचे सेवन करू शकता.

6/7

हायड्रेट राहा :

हिवाळ्यात तहान कमी लागल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. शरीरात पाण्याची कमतरता झाली की त्वचा ही कोरडी होऊ लागते आणि खाज येते. तेव्हा हिवाळ्यात देखील शरीराला आवश्यक तसे पाणी पीत राहा. 

7/7

स्वच्छ कपडे घाला :

हिवाळ्यात शरीराला जास्त घाम येत नाही. त्यामुळे बरेचजण खूप दिवस एकाच इनरविअर आणि कपडे घालतात. ज्यामुळे त्यावर बॅक्टेरिया जमा होतात. तेव्हा कपडे नीट स्वच्छ करा.