Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने पत्नीला फेकून मारला तवा अन्...
Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी हा वादांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता पुन्हा तो एकदा वादात सापडला आहे.
Vinod Kambli Controversies: माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय आहे. दारुच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केलाय. दारूच्या नशेत विनोद याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे विनोद कांबळीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या पत्नीने मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
शुक्रवारी दुपारी विनोद कांबळी दारुच्या नशेतच वांद्रेतल्या आपल्या घरी पोहोचला. त्यानंतर पत्नीसोबत त्याची बाचाबाची झाली. तेव्हा विनोद कांबळीने कुकिंग पॅनचं (स्वयंपाकाचा तवा) फेकून मारला. या घटनेत अँड्रिया यांच्या डोक्याला जखम झाली आहे. दारूच्या नशेत कांबळीने हे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे. ही घटना वांद्रे येथील कांबळेच्या घरात घडल्याचं अँड्रिया हिने म्हटलं आहे. अँड्रियाच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीविरोधात वांद्रे पोलिसांमध्ये IPC 324 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून विनोद कांबळीला अद्याप अटक केलेली नाही.
वाचा : सिद्धार्थ मल्होत्राचं 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय नाव, आता करतोय कियारा अडवाणीशी लग्न
पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी त्यांचा 12 वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात कांबळी यांनी त्यांच्या पत्नीच्या अंगावर कुकिंग पॅन फेकून मारला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर विनोद कांबळीच्या पत्नीवर उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.