नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला असला तरी २७ नोव्हेंबरला मुंबईच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये ग्रॅड रिसेप्शनचे आयोजन केले होते. रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता सेन, सुरेश रैना, सचिन तेंडूलकर, युवराज सिंग यांसारख्या अनेक खेळाडूंनी आणि स्टार्सने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. 


मात्र विराट आणि अनुष्काचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. विराट आणि अनुष्काने रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली. 



काही दिवसांपूर्वी विराटने झहीर खान आपला लव्ह गुरू असल्याचे सांगितले होते.