श्रीदेवीच्या मृत्यूनंतर मी आजूबाजूच्या महिलांकडे...; बोनी कपूर यांचा मोठा खुलासा! 'आकर्षणा'चाही उल्लेख

Boney Kapoor Shocking Comment On Sridevi Death: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा 20 वर्षांचा संसार 2018 मध्ये श्रीदेवीच्या आकस्मिक निधनामुळे अचानक मोडला. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोनी कपूर यांनी धक्कादायक खुलासा केलाय. ते काय म्हणालेत पाहूयात...

| Dec 28, 2024, 10:18 AM IST
1/12

boneykapoorsridevi

वेगवेगळ्या समारंभांमधील फोटोंमुळे यापूर्वी अनेकदा वादात सापडलेल्या बोनी कपूर यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर म्हणजेच श्रीदेवीच्या मृत्यूनंतरच्या कालावधीसंदर्भात बोलताना केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

2/12

boneykapoorsridevi

मागील काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांबरोबरच कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या बोनी कपूर यांचे अभिनेत्रींबरोबरचे फोटो अनेकदा नको त्या कारणानेच चर्चेत राहिले. कधी उर्वशी रौतेला तर कधी प्रियमणीबरोबरचे त्यांचे वागणे वादाचा विषय ठरलं.

3/12

boneykapoorsridevi

प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर आणि त्यांची दिवंगत पत्नी अभिनेत्री श्रीदेवी या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणेच आहे. दोन दशकांपासून अधिक काळ या दोघांचं जोडपं हे चर्चेचा विषय राहिलं. 

4/12

boneykapoorsridevi

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी मनोरंजन क्षेत्रातील आपल्या प्रवासामध्ये एकमेकांना फारच उत्तम साध दिली. दोघांनी एकमेकांना छान संभाळून घेतलं. मात्र 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीचा दुबईमध्ये आकस्मिक मृत्यू झाल्याने आणि या दोघांच्या प्रेमकथेचा अचानक शेवट झाला.

5/12

boneykapoorsridevi

श्रीदेवीच्या निधनानंतर ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झाला त्यावरुन अनेक शंका उपस्थित झाल्याने बोनी कपूर यांचीही चौकशी करण्यात आली. मृत्यूनंतरही पत्नीबद्दल अनेक मुलाखतींमध्ये भरभरुन बोलणाऱ्या बोनी कपूर यांनी 'एबीपी लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत आपलं मन मोकळं केलं आहे.

6/12

boneykapoorsridevi

आजही आपल्याला श्रीदेवीची फार आठवण येते हे सांगतानाच, पत्नीच्या मृत्यूनंतर आयुष्य बदललं असलं तरी तिच्याबद्दल वाटणारं प्रेम हे आहे तसेच असल्याचं बोनी कपूर यांनी म्हटलं आहे.  

7/12

boneykapoorsridevi

"आम्हाला एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही. मी तिच्या प्रेमात होतो, मी तिच्या प्रेमा आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या प्रेमात राहणार आहे," असं बोनी कपूर यांनी म्हटलं आहे.  

8/12

boneykapoorsridevi

आयुष्याचा जोडीदार म्हणून श्रीदेवीने माझी निवड केली तो माझ्यासाठी फारच आनंदाचा क्षण होता असंही बोनी कपूर यांनी सांगितलं. आयुष्यामध्ये अजून आपल्याला काय हवं असतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

9/12

boneykapoorsridevi

"मी तिला कधीच फसवलं नाही. ती सोबत असताना मला कधीच इकडे तिकडे (परस्रीयांकडे) पहावं लागलं नाही. माझ्यासाठी ती सर्वकाही होती," असं बोनी कपूर यांनी पत्नीबद्दल बोलताना सांगितलं.  

10/12

boneykapoorsridevi

मात्र माणूस म्हणून आपल्या काही मर्यादा असल्याने आपण नक्कीच श्रीदेवीच्या मृत्यूनंतर काही महिलांकडे आकर्षित झालो, अशी कबुलीही बोनी कपूर यांनी दिली.  

11/12

boneykapoorsridevi

श्रीदेवी कायमच माझ्या मनात असणार आहे. माझ्या हृदयावरही तिचे राज्य आहे. मात्र असं असलं तरी मी एक माणूस असून तो इतर महिलांकडे आकर्षित होतो, असं विधान बोनी कपूर यांनी केलं आहे.   

12/12

boneykapoorsridevi

"(श्रीदेवीच्या मृत्यूनंतर) आजही माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. माझ्या आजूबाजूच्या महिलांकडे मी आकर्षित होतो पण तिच्याबद्दलचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही," असं बोनी कपूर म्हणाले. इतरांकडे आकर्षित होत असलो तरी श्रीदेवीसाठी मनात असणारं प्रेम हे अजरामर आणि कायमस्वरुपी असल्याचंही बोनी कपूर म्हणाले.