Virat Kohli's Wife Anushka Sharma Pregnant : भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याकडे चाहत्यांसाठी 'गोड बातमी' आहे. विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहे. विराट आणि अनुष्काची लेक वामिकाबरोबर खेळणारा नवा सदस्य लवकरच येणार आहे. अनुष्का आणि विराटचं त्रिकोणी कुटुंबामध्ये काही महिन्यांमध्येच चौथ्या सदस्याची भर पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

35 वर्षीय अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'नं या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे दिलं आहे. अनुष्का 2024 मध्ये पुन्हा आई होणार असून सध्या तिचा गरोदरपणाचा दुसरा महिना सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दोघांनीही यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हे दोघेही लवकरच सोशल मीडियावरुन पहिल्या प्रेग्नंसीप्रमाणे अधिकृत घोषणा करतील असं सांगितलं जात आहे.



मॅटर्निटी होमला दिली भेट


अनुष्का मागील बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा इतर ठिकाणी दिसलेली नाही. इतकंच नाही तर नेहमी विराटला पाठिंबा देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात जाऊन चेअरअप करणारी अनुष्का यंदाच्या वर्ल्डकपदरम्यान स्टेडियममध्ये दिसणार नाही. यामागील खरं करणं हे प्रेग्नंसीचं असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी होणाऱ्या आईच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी म्हणजेच रुटीन प्रेग्नसी चेकअपसाठी एका मॅटर्निटी होमला भेट दिल्याचेही समजते. यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो काढले मात्र, विराट आणि अनुषा दोघांनी पापाराझींना हे फोटो कुठेही प्रकाशित करु नका. आम्ही स्वत: लवकरच ही बातमी जाहीर करु अशी कळकळीची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत हे फोटो समोर आणण्याचं पापाराझींनी टाळल्याचं समजतं. मात्र, आता अनुष्का आणि विराटच्या जवळच्या व्यक्तीने हे दोघे दुसऱ्यांचा आई-बाब होणार असल्याच्या वृत्ताला नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिल्याचं समजतं.


हेही वाचा : दयाबेनमागोमाग जेठालालही घेणार मालिकेतून ब्रेक! अभिनेत्याच्या व्हिडीओमुळं चर्चांना उधाण


दरम्यान, वामिकाचा जन्म झाल्यापासून ते दोघं या गोष्टीची काळजी घेताना दिसत आहेत की कुठेच तिचा फोटो व्हायरल होणार नाही. इतकंच नाही तर ते दोघे जेव्हा कधी वामिकासोबत फोटो शेअर करतात तेव्हा तिचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतात. याविषयी बोलातना विराट म्हणाला होता की 'आम्ही हा निर्णय घेतला आहे की आमच्या बाळाचा चेहरा आम्ही सोशल मीडियावर शेअर करणार नाही, कारण तिला सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करायला हवा की नको याची जाणीव नाही. ती स्वत: या गोष्टीचा निर्णय घेईल.' 


अनुष्का शर्माविषयी बोलायचे झाले तर तिनं 'चकदा एक्सप्रेस' या तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण संपवलं आहे. या चित्रपटात ती माजी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.