मुंबई : रॉयल चॅंलेंजर्स बॅंगलोरचा स्टार खेळाडू, माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मपासून झूंजतोय. विराटच्या या फॉर्मवरून प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्याच्यावर चौफेर टीका होते. आजच्या हैदराबाद विरूद्धच्या सामन्यातही विराट शून्य रन्सकरून माघारी परतला. या त्याच्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा खराब फॉर्मची चर्चा सुरू झाली आहे. विराटच्या या फॉर्मवर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे. शोएब अख्तर याने विराटची पाठराखण केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. खरंतर विराट जगदीसा सुचिताच्या चेंडूवर आऊट झाला, तो बाद होण्यासारखा नव्हता, पण विराट बाद झाला. त्याने विलियमसनकडे सोपा झेल दिला. 


विराटने यंदाच्या हंगामातील कामगिरी पाहता गेल्या 12 सामन्यात त्याने 216 धावा केल्या आहेत. त्याने 12 डावात फक्त एक अर्धशतक झळकावले. मागच्या दोन वर्षात विराट कोहलीच्या बॅटमधून शतकही निघाले नाही. विराट कोहलीवर टीकेची फटकेबाजी सूरू आहे.  


शोएब अख्तर काय म्हणाला ? 


विराटला काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. सध्या त्याच्यावर दबाव असल्यामुळे तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाहीय अस अख्तरने म्हटलेय. 


सध्या विराटने फक्त मैदानावर जाऊन खेळाचा आनंद घेण्याची गरज आहे. धावा बनवण्यासाठी तो खुप प्रयत्न करतोय.मी विराट कोहली आहे, आणि मी जे नेहमी करतो, ते आज मी करू शकत नाहीय, असा विचार तो करतोय. 


हीच वेळ असते, जेव्हा तुम्ही मनुष्य आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे असे शोएब म्हणाला. माणसं अपयशी ठरतात. पण विराट सारखे लोक जे महान खेळाडू आहेत. त्यांना माहित असतं, की अपयशानंतर कमबॅक कस करायचं. सध्या सगळेच जण त्याच्या मागे लागलेत.