मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास रिसेप्शन ठेवलं होतं.


दिग्गजांची हजेरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या व्यक्तींसाठी हे खास रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. मोठे-मोठे व्यक्ती या रिसेप्शनला उपस्थित होते. पण अनुष्का आणि विराटचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्काच्या रिसेशप्शनला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली पण या सामान्य व्यक्तीचीच चर्चा होत आहे.


पण एकाचीच चर्चा


गयान सेनानायके असं या व्यक्तीचं नाव आहे. जो श्रीलंकन क्रिकेट टीमचा प्रशंसक आहे आणि सध्या श्रीलंकेच्या टीमसोबत भारतात आले आहेत. पण ते भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचे खूप मोठे फॅन आहेत.



विराटचा सेल्फी व्हायरल


गयान सेनानायके श्रीलंकेच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी भारतात आले आहेत. ते नेहमी क्रिकेट स्‍टेडियमवर दिसतात. आपल्या या फॅनला विराट कोहलीने खास आमंत्रण दिलं होतं. विराटने आपल्या या चाहत्यासोबत सेल्फी देखील काढला.