मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, (AAI)भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय विमानतळ प्राधिकरणात एकूण ५४२ पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या सर्व जागा ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदाच्या आहेत. पाहूयात कुठल्या पदासाठी एकूण किती जागांवर भरती होत आहे.


ज्युनिअर एक्झिक्युटिव्हच्या एकूण ५४२ जागा 


पद - ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (सिव्हील)


जागा - १०० जागा


 


पद - ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) 


जागा - १०० जागा


 


पद - ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)


जागा - ३३० जागा


 


पद - ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर)


जागा - १२ जागा


 


शैक्षणिक पात्रता - गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (सिव्हील / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आर्किटेक्चर / दूरसंचार) आणि GATE २०१८ आवश्यक


 


वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे


 


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ एप्रिल २०१८


या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/GATE%20ADVT%202018.pdf या संकेतस्थळावर पहायला मिळेल.


अर्ज करण्यासाठी https://www.aai.aero/en/careers/recruitment या लिकंवर क्लिक करा.