मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासंबंधी नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे. हजाराच्यावर झालेले वैद्यकीय प्रवेश रद्द करायचे की केवळ मराठा आरक्षणांतर्गतचेच प्रवेश रद्द करायचे याबाबत विभागाची बैठक सुरु झाली आहे. जर पूर्ण प्रक्रीया रद्द झाली तर अनेकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तर मराठा आरक्षणात झालेले प्रवेश ही एक समस्या या निर्णयामुळे होऊन बसली आहे.


वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर वैद्यकीय शिक्षण विभागापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी झालेले १ हजार ४३५ प्रवेश रद्द करायचे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच केवळ मराठा आरक्षणांतर्गत झालेले प्रवेशच रद्द करायचे, हाही प्रश्न आहे. त्यामुळे पुढे करायचे काय? यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक सुरु झाली.


दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्चन्यायालयाच्या  नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीयसाठीचं यंदाच्या वर्षाचे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या  निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.