मुंबई : राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शाळा बुधवारपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करत आहेत. मात्र मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत.(All Mumbai schools to remain closed : BMC)  मुंबईतील शाळा (Mumbai school) सुरू करण्याबाबत पालिकेने अजूनही निर्णय घेतलेला नाही. दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असतानाही शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थी, शिक्षक हवालदिल झालेत. राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास २३ नोव्हेंबरपासून परवानगी देण्यात आली. मात्र, मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा धोका कायम असल्याने मुंबईत शाळा सुरु न करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळा  27 जानेवारी 2021पासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मुंबईत शाळा बंद राहतील, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाने दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सध्या तरी शाळा सुरु करता येणार नाही, असे म्हटले आहे. शहरातील कोरोनव्हायरस आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.  मात्र, नवीन कोरोना स्ट्रेनचा धोका पाहता, शाळा सुरु करता येणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


कोरोनाची स्थिती पाहता,  शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड -19 च्या स्थितीनंतर देशात काही ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याठिकाणी कोरोनाचा धोका निर्माण झाला. त्यामुळे  मुंबईत खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण घेण्यावर भर द्या, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.