मुंबई : मुंबई विद्यापाठीचे सर्व निकाल यावर्षी रखडणार आहेत. त्याचा फटका मुंबईतल्या लाखो विद्यार्थ्यांना बसणार आहे. मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंट उशिरा सुरु केल्याने टिवाय बीए, बीएससी, कॉमर्स आणि इतर व्यावसायिक पदवी परीक्षेचे निकाल उशिरा लागणार आहेत.


साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होणारे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. इतकंच नाही तर परदेशी शिकण्यासाठी जाणा-या विद्यार्थ्यांनाही निकालाची आणखी काही आठवडे वाट पहावी लागणार आहे. ऑनलाईन पेपर तपासणीला उशीरा सुरूवात झाल्याने हे निकाल रखडणार आहेत.