बीएसएनएलमध्ये बंपर भरती
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये बंपर भरती निघालीये.
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये बंपर भरती निघालीये. बीएसएनएलमध्ये ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसरच्या ९९६ पदांसाठी भरती होतेय. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे. देशभरातून ही भरती होणार आहे.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त संस्थेची M.COM/CA/ICWA/CS ही डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच यासाठी २० ते ३० वर्षे ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलीये. दरम्यान, SC/ST साठी वयोमर्यादेत ५ वर्षांची, obc साठी ३ वर्षांची आणि PWD उमेदवारांसाठी १० वर्षांची सूट आहे.
या पदासाठी पेमेंट स्केल १६,४०० ते ४०,५०० रुपये आहे. देशातील २८ राज्यांमध्ये ही भरती होतेय.
या पदासाठी ऑनलाईन परीक्षेद्वारे निवड केली जाईल. या पदासाठी अर्ज करताना फीही आकारली जाणार आहे. OC/OBC उमेदवारांसाठी १००० रुपये तर SC/ST उमेदवारांसाठी ५०० रुपये फी आहे. ऑनलाईन इंटरनेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्डच्या सहाय्याने तुम्ही ही फी भरु शकता. ११ ऑक्टोबर पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. http://www.bsnl.co.in/ या वेबसाईटवर अर्ज करण्याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.
या राज्यांमध्ये इतक्या पदांवर भरती
अंदमान निकोबार: 13
आंध्र प्रदेश: 72
आसाम: 32
बिहार : 22
छत्तीसगड : 19
चेन्नई टेलिकॉम डिस्ट्रिक : 23
गुजरात : 71
हरयाणा : 36
हिमाचल प्रदेश : 18
जम्मू-कश्मीर : 16
झारखंड : 11
कर्नाटक : 62
केरळ : 41
कोलकाता टेलिकॉम डिस्ट्रिक्ट : 08
मध्य प्रदेश : 38
महाराष्ट्र : 135
नॉर्थ ईस्ट-I : 14
नॉर्थ ईस्ट-II : 05
नॉर्दन टेलिकॉम रिजन NTR : 16
उडिसा : 20
पंजाब : 61
राजस्थान : 46
तमिळनाडू : 34
तेलंगणा : 19
उत्तर प्रदेश (East) : 65
उत्तर प्रदेश (West) : 41
उत्तराखंड : 11
पश्चिम बंगाल : 56